budget 2020 key points information in marathi nirmala sitharaman 
देश

Budget 2020 : केंद्रिय अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

वृत्तसंस्था

अर्थसंकल्प :
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे थोडक्यात...

-2025 पर्यंत दुध उत्पादन दुप्पट करणार
- आयुषमान भारत योजनेअंतर्गत 20 हजार रुग्णालये 
- टीबी हारेगा, देश जितेगा हे मिशन राबविण्यात येणार
- 2025 पर्यंत टीबी हटविण्याचा सरकारचा उद्देश
- 12 आजारांसाठी मिशन इंद्रधनुष योजना
- पंचायत व ग्रामविकासासाठी  2.83 कोटी रुपयांची तरतूद
- प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा होणार
- क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार
- नवे शिक्षण धोरण लवकरच आमलात येणार
- शैक्षणिक धोरणासाठी 2 लाख सूचना आल्या
- गरिबांसाठी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण राबविणार
- नव्या अभियंत्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप सुरु करणार
- शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इंटर्नशिप करता येणार
- गरिबांना दर्जेदार शिक्षण पुरविणार
- शिक्षण क्षेत्रातही थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आणणार
- उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणार
- चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी विद्यापीठ सुरु होणार
- पीपीपी मॉडेलद्वारे विद्यापाठ सुरु करणार
- आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतूद
- शिक्षणासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद
- मार्च 2025 पर्यंत डिप्लोमासाठी 150 संस्था सुरु करणार
- राष्ट्रीय पोलिस विद्यापीठाचा प्रस्ताव
- नॅशनल फॉरेन्सिक विद्यापीठ सुरु करणार
- आघाडीच्या १०० मध्ये असणाऱ्या शिक्षण संस्थांकडून डिजीटल शिक्षण उपलब्ध करणार
- पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जोडणे शक्य आहे, केंद्र सरकार यासाठी पुढाकार घेईल 
- 3 हजार कौशल्य शिक्षण विकास केंद्रे सुरु करणार
- इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढीवर भर देणार
- मोबाईल उत्पादन वाढीसाठी विशेष तरतूद
- 5 नवी स्मार्ट शहरे बनविणार
- गुंतवणूक मंजुरीसाठी नवा कक्ष उभारणार
- निर्यातीसाठी नवी निर्विक योजना सुरु करणार
- वाणिज्य क्षेत्रासाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद
- स्कील इंडियासाठी 3 हजार कोटींची तरतूद
- वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 4 वर्षांत 1480 कोटी दिले
- सर्व जिल्ह्यांमध्ये स्वस्त औषध केंद्र उभारणार
- चेन्नई-बंगळूर, दिल्ली-मुंबई दरम्यान एक्स्प्रेस हायवे सुरु करणार
- तेजससारख्या आणखी नव्या रेल्वे सुरु करणार
- तेजससारख्या रेल्वेगाड्या पर्यटन स्थळांशी जोडणार
- नॅशनल लॉजिस्टिक धोरण सुरु करणाऱ
- रेल्वेच्या रिकाम्या जागांवर सौरउर्जा प्रकल्प सुरु करणार
-  27 हजार किमी रेल्वे मार्ग इलेक्ट्रिक करणार
- 550 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुर करणार
- 2024 पर्यंत 6 लाख किमीचे रस्ते बनविणार
- पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार
- सागरी किनारी दोन हजार किमीचे रस्ते उभारणार
- चांगल्या सुविधा देण्यासाठी आता रेल्वेमध्ये खासगी सहभाग वाढणार
- जल जीवन योजनेसाठी सुमारे 3.6लाख कोटी रुपयांची तरतूद. प्रत्येक घरात पाणी पोचवणार
- आर्थिक दळणवळण वाढीसाठी नद्यांचा वापर होणार
- मुंबई-अहमदाबाद गाड्या वाढविण्यात येणार
- भारतनेट योजनेसाठी 6 हजार कोटींची तरतूद
- 1 लाख ग्रामपंचायतींनी इंटरनेट सुविधा पुरविणार
- देशात डेटा सेंटर पार्क सुरु करणार
- भारत नेटद्वारे देश जोडणार, 6 हजार कोटींची तरतूद
- क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी 8 हजार कोटींची तरतूद
- खाजगी क्षेत्राला डेटा सेंटर पार्क निर्मिती करण्यासाठी आवाहन
- प्रत्येक घरातील वीज मीटर 3 वर्षांत बदलण्यात येणार
- घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार
- वीज क्षेत्रासाठी 22 हजार कोटींची तरतूद
- 2024 पर्यंत नवी शंभर विमानतळे उभारण्यात येणार
- 6 लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले
- अंगणवाडी वर्कर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार
- पोषण आहार योजनेसाठी 35 हजार 600 कोटींची तरतूद
- आंगणवाडी योजनेंतर्गत 10 लाख नागरिकांना लाभ
- बेटी बचाओ, बेटी पढाओचा फायदा झाला
- महिलांसाठी 28 हजार 600 कोटींची तरतूद
- शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या वाढली
- अनुसुचित जाती व जमातीसाठी (एससी, एसटी) 85 कोटींची तरतूद
- संस्कृती मंत्रालयासाठी 3 हजार 150 कोटी रुपयांची तरतूद
- 5 पुरातत्व ठिकाणांचा विकास करणार
- 4 संग्रहालयांचे नुतनीकरण करणार
- रांचीमध्ये आदिवासी संग्रहालय स्थापन करणार
- अहमदाबादेत समुद्री संग्रहालय उभारणार
- संस्कृती रक्षणासाठी अभिमत विद्यापीठ सुरु करणार
- स्टार्ट अपसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करणार
- ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांसाठी 95 हजार कोटींची तरतूद
- कार्बन सोडणारे थर्मल प्लान्ट बंद करणार
- पर्यटन विभागासाठी 2500 कोटींची तरतूद
- स्वच्छ हवेसाठी 4 हजार 400 कोटींची तरतूद
- कंपनी कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करू
- करदात्यांचा कसलाही छळ होणार नाही
- बँकांमधील नोकरभरतीत बदल होणार
- देशात कायद्यानुसार टॅक्स पेयर चार्टर आणणार
- टॅक्स भरणाऱ्यांच्या अडचणी दूर करणार
- राष्ट्रीय नोकरभरती संस्था सुरु करणार
- सर्व CAT संगणकाद्वारे घेतल्या जाणार
- कर चोरी करणाऱ्यांविरोधात कायदा आणणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT