Crime News Team eSakal
देश

Bulli Bai App : भावनाशुन्य हॅकरनं पोलिसांना दिली आत्महत्येची धमकी

नीरज बिश्नोईबद्दल पोलिसांनी काही धक्कादायक खुलासेही केले आहेत.

सुधीर काकडे

बुली बाई हे App (Bulli Bai Aplication) तयार करुन मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या आरोपात पोलिसांनी नीरज बिश्नोई (Niraj Bishnoi) या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्यातच आता नीरजने तो सुल्ली डील्स हे App तयार करणाऱ्या व्यक्तिच्या संपर्कात असल्याचं कबूल केलंय. त्यानंतर आता या आऱोपीने थेट आत्महत्येची धमकी देत तसा प्रयत्न देखील केल्याचं समजतंय. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवली आहे.

बुली बाई अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार नीरज बिश्नोई एक धुर्त आणि असंवेदनशील असा तरुण असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामळे तो कधी काय करेल हे सांगता येत नाही. एवढंच नाही तर नीरजने पोलिस कोठडीत आत्महत्येची धमकीही दिली असून यादरम्यान त्याने दोनदा स्वतःला इजा करण्याचाही प्रयत्न केला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSC स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे. ४८ तासांहून अधिक काळ पोलिस कोठडीत असलेला बिष्णोई तासाला काहीतरी नवीन दावा करत आहे. न्यायालयाने गुरुवारी बिष्णोईला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोईने १५ वर्षांचा असताना शाळेची वेबसाइट हॅक केली होती. तो सवयीचा हॅकर होता. बिश्नोईने यापूर्वी पाकिस्तानातील अनेक शाळा आणि विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. सध्या पोलीस या दाव्यांमध्ये सत्यता पडताळण्यात गुंतले आहेत. बुधवारी रात्री बिश्नोईला दिल्ली पोलिसांच्या IFSO स्पेशल सेलने आसाममधील जोरहाट येथून अटक केली. जी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT