Bus Accident Esakal
देश

Bus Accident : यमुना एक्सप्रेस वेवर बसचा भीषण अपघात; 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू तर 12 जण जखमी

जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजक असल्याची माहिती

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीहून बिहारच्या दिशेने निघालेल्या बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट डिव्हायडरला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. काही क्षणातच बसने दोन तीन वेळा पलटी मारली. या भीषण अपघातामध्ये ३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 12 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना रविवारी पहाटेच्या सुमारास यमुना एक्‍स्‍प्रेसवर घडली आहे.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पोलिसांनी मृत ३ प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक दारूच्या नशेत होता. तो अतिवेगाने बस चालवत होता. त्यामुळे त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस यमुना एक्सप्रेसवेच्या दुभाजकाला धडकली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांना अनेक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ गंभीर जखमींना आग्रा येथे हलवण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT