crime man kill himself 
देश

धक्कादायक! व्हॉटसअॅपवर पाठवला फोटो आणि दिली स्वत:च्याच हत्येची सुपारी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कुणी आपल्याच हत्येची सुपारी देऊ शकतं का? पण खरंच अशी घटना घडली असून एका व्यावसायिकाच्या हत्येचा तपास करताना धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पटपडगंज इथून 9 जूनला व्यावसायिक गौरव बन्सल बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह रणहौला इथं एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना अल्पवयीनांसह चार जणांना पकडलं आहे. 

पोलिसांनी अशी माहिती दिली की, गौरव बन्सल यांच्यावर कर्ज होते. तसंच त्यांनी विमाही उतरवला होता. त्यांनी अशी कल्पना लढवली की स्वत:ची हत्या घडवून आणायची. ज्यामुळे विम्याची रक्कम घरच्यांना मिळेल. व्यावसायिकाने स्वत:च्या मृत्यूची सुपारी सोशल मीडियावर एका अल्पवयीनाला दिली त्याने यामध्ये आणखी तीन साथीदारांची मदत घेतली. ठरल्यानुसार एखाने गौरव बन्सल यांचे हात बांधले आणि चौघांनी हत्या करून मृतदेह झाडावर लटकवला. 

बन्सल यांनी फक्त 90 हजार रुपयांमध्ये स्वत:ची हत्या करून घेतली. या प्रकऱणी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये भाजी विक्रेता असलेला कुमार यादव, 18 वर्षीय सूरज, शिलाई करणारा सुमित कुमार यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी मोहन गार्डनमध्ये राहतात. 

पोलिसांना 10 जून रोजी माहिती मिळाली की एक मृतदेह झाडाला लटकलेला आहे. चौकशीत मृताचे नाव गौरव बन्सल असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून धक्कादायक अशी माहिती समोर आली. मनोज, सुमित आणि एका अल्पवयीनाने मिळून गौरव बन्सल यांची हत्या केली. गौरव यांनी आधीच पैसे देण्याची ऑफर दिली होती. तसंच त्यांचा एक ते दीड कोटी रुपयांचा विमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वत:च्या हत्येची सुपारी देण्यासाठी गौरवने फोनवरून अल्पवयीन मुलाशी संपर्क केला होता. तसंच कारमधून रणहौला इथं पोहोचला. जाता जाता व्हॉटसअॅपवर स्वत:चा फोटोही सेंड केला होता. ते रणहौला इथं पोहोचताच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या गळ्यात फास टाकून हत्या केली आणि लटकवलं. यासाठी बन्सल यांनी स्वत:च यासाठी दोरी आणून दिली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT