businessman in hyderabad sacrificed 101 goats mp Asaduddin Owaisi Car Attack 
देश

हैद्राबादेत असदुद्दीन ओवैसींच्या दिर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांचा बळी

काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशातील मेरठहून दिल्लीला निघालेल्या खासदार ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची घटना घडली होती

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा खासदार AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा (Bagh-e-Jahanara) येथे एका व्यावसायिकाने तब्बल 101 बकऱ्यांचा बळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या बकऱ्यांच्या बलिदानासाठी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मलाकपेटचे आमदार आणि एआयएमआयएम नेते अहमद बलाला (Ahmed Balala) यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशातील मेरठहून दिल्लीला निघालेल्या खासदार ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची घटना घडली होती (Asaduddin Owaisi Car Attack) त्यानंतर हा दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. या घटनेत गोळीबार करणारे पळून गेले होते

3 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांचे समर्थक त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा मंजूर केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली.

ओवेसी यांच्यावरील हल्ल्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या हल्ल्यानंतर दोन आरोपींना अटक करून 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असली, तरी यानंतरही या हल्ल्यात आणखी अनेक जण सहभागी असल्याची भीती व्यक्त होत आहे. हापूरमध्ये अखिल भारतीय AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर झालेल्या गोळीबारात वापरलेली शस्त्रे मेरठमधून आणण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

गाझियाबादमध्ये ओवेसी यांच्या गोळीबाराचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. गुरुवारी दुपारी दोन अज्ञात तरुणांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. ओवेसी यांनी सर्वप्रथम ट्विट करून या घटनेची माहिती दिली. दिल्ली-लखनौ एक्स्प्रेस वेच्या छिजारसी टोल प्लाझा येथे ही घटना घडली. ही संपूर्ण घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत होते. एकाने लाल हुडी घातली होती आणि एकाने पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातली होती. ओवेसींच्या ताफ्याच्या वाहनाने धडक दिल्याने लाल रंगाचा हुडी घातलेला हल्लेखोरही जखमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

Latest Marathi News Live Update : दोन पोलिस अधिकाऱ्यांना केले सेवेतून बडतर्फ

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT