PM Modi ANI
देश

स्वच्छ भारत आणि अमृत 2.0 ला मान्यता; वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळाने सैनिक शाळा सोसायटी अंतर्गत १०० खासगी आणि सरकारी सैनिक शाळांना मान्यता देण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय, अटल मिशन फॉर रिज्यूनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन- अमृत २.० लाही कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने फॉस्फेट, पोटॅश खतांसाठी २८,६५५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान मंजूर केले.

अमृत 2.0 ला मंजूरी

घरोघरी नळाद्वारे पेयजल पोचविण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘अमृत- २.०’ या २.७७ लाख कोटी रुपये खर्चाच्या योजनेला तसेच शहरी भागांत स्वच्छतेसाठी शहरी स्वच्छ भारत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला ही आज मंत्रिमंडळाने औपचारिक मंजुरी दिली आहे. या योजनेवर १ लाख ४१ हजार ६०० कोटी रुपये खर्च होणार आहे. ‘अमृत- २.०’ आणि शहरी ‘स्वच्छ भारत मोहीम’ या दोन्हीही योजनांची अंमलबजावणी २०२५-२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

१०० खासगी आणि सरकारी सैनिक शाळांना मान्यता

या व्यतिरिक्त नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत सैनिक स्कूल सोसायटीशी देशातील १०० सरकारी आणि खासगी शाळांना संलग्न करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. थोडक्यात, या शाळांमध्ये सैनिक स्कूल सोसायटीचा अभ्यासक्रम शिकविला जाईल. या अभ्यासक्रमासाठी नव्या शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) इयत्ता सहावी पासून ५००० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

खतांसाठी २८,६५५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान

‘डीएपी’ आणि ‘एनपीके’ खतांवर रब्बी हंगामासाठी (१ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२) २८ हजार ६५५ कोटी रुपयांचे अंशदान देण्याचा निर्णय आज रात्री उशिरा झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना ‘डीएपी’ च्या थैलीमागे ४३८ रुपये आणि ‘एनपीके’ खतांच्या थैलीमागे १०० रुपये असा फायदा होईल. हे अनुदान १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

Latur District Bank: ‘जिल्हा बँक सहकारी राहिली नाही, देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली’; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT