cable bridge collapsed in the Machchhu river Morbi area Several people fear injured  
देश

Gujrat: भीषण अपघात! केबल ब्रिज तुटल्याने अनेक जण नदीत कोसळले; बचावकार्य सुरू

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.

अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 ते 500 लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. हा पूल खूप जुना असून काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. 5 दिवसांपूर्वी ते सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.

बचाव पथकाने अनेकांना नदीतून वाचवले असून त्यांना रुग्णालयात पाठवले आहे. इतर लोकांचाही शोध सुरू आहे. सर्व लोकांना लवकरात लवकर नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्याने इथे खूप गर्दी होती.

या अपघातानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केले की, मोरबीमध्ये केबल पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.

त्याचवेळी, पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके जमवावीत, परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवावे आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करावी असे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT