Kolkata High Court Esakal
देश

"महिलांना स्वीटी किंवा बेबी म्हणणे लैंगिक टिप्पणी नाही," हायकोर्ट पुढे म्हणाले...

Kolkata High Court: वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रारदाराशी बोलताना 'हगिंग द कोस्ट' हा वाक्प्रचार लैंगिक रीतीने वापरल्याचा आरोपही न्यायालयाने मान्य केला नाही.

आशुतोष मसगौंडे

कोलकाता उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना महिलांना स्वीटी किंवा बेबी म्हणणे ही लैंगिक टिप्पणी नाही आणि ते नेहमीच चुकीची नसते, अशी टिप्पणी केली.

यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले की, महिलांना दिलेले हे संबोधन काही सामाजिक वर्तुळात प्रचलित आहे आणि या शब्दांचा वापर केल्याने नेहमीच एखाद्याची लैंगिक इच्छा प्रकट होत नाही.

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांनी नुकत्याच लैंगिक छळाशी संबंधित एका प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचा गैरवापर केल्यास महिलांसाठी आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात.

या प्रकरणात एका महिलेने आरोप केला आहे की, कामाच्या ठिकाणी तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वीटी आणि बेबी असे शब्द वापरले आहेत.

कोस्ट गार्ड म्हणून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आरोप केला आहे की, तिच्या वरिष्ठाने अनेक प्रकारे तिचा लैंगिक छळ केला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्यात अशा शब्दांचा वापर सूचक असल्याचा युक्तिवाद तक्रारदाराने आपल्या याचिकेत केला आहे.

त्याचवेळी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वकिलाने सांगितले की, त्यांच्या अशिलाने हे शब्द कधीच लैंगिक उपरोध म्हणून वापरले नाहीत. तक्रारदाराने आक्षेप व्यक्त केल्यावर त्यांनी असे शब्द वापरणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उच्च न्यायालयाने हे मान्य केले की, अशा शब्दांचा वापर अंतर्गत तक्रार समितीने (ICC) अयोग्य मानला होता, परंतु या शब्दांचा लैंगिक आकांक्षेशी संबंध जोडण्याची गरज नसल्याचे पुढे म्हटले.

वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रारदाराशी बोलताना 'हगिंग द कोस्ट' हा वाक्प्रचार लैंगिक रीतीने वापरल्याचा आरोपही न्यायालयाने मान्य केला नाही. एकल-न्यायाधीश म्हणाले की तटरक्षक वर्तुळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य शब्दावलीचा हा एक प्रकार आहे. तटरक्षक दलांमध्ये अशी संज्ञा सामान्य आहे.

या प्रकरणी तक्रारदाराची रिट याचिका फेटाळण्यात आली असली, तरी आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या आणि प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यावर कोणतेही भाष्य न्यायालयाने केले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT