Lok Sabha Election 2024  esakal
देश

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Lok Sabha Election 2024 : या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रविवारी सांगता झाली. या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती, रायगड, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी—सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा यात समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय कर्नाटकमधील 14, उत्तर प्रदेशातील 10, मध्य प्रदेशातील 8 आणि छत्तीसगडमधील 7 मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यात 10 जागांवर हाय प्रोफाईल लढती होत आहेत. मध्य प्रदेशातील गुणा येथे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुकाबला कॉंग्रेसच्या राव यादवेंद्र सिंह यांच्याशी होत आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी शिंदे कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांचा भाजपचे उमेदवारी के. पी. यादव यांनी पराभव केला होता.

उत्तर प्रदेशातील आग्रा मतदारसंघात केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल हे मैदानात आहेत. त्यांची लढत बसपाच्या पूजा अमरोही आणि सपाच्या सुरेशचंद्र कदम यांच्याशी होत आहे. दलित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असूनही अद्यापपर्यंत या मतदारसंघात बसपाला खाते उघडता आलेले नाही. ज्या अन्य प्रमुख नेत्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये बंद होणार आहे, त्यात सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव (मैनपुरी), भाजप नेते प्रल्हाद जोशी (धारवाड), कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी (बहरामपूर) आणि भाजप नेत्या पल्लवी डेम्पो (दक्षिण गोवा) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT