Case against BJP MP 
देश

Case against BJP MP: मशिदीबाबत द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदाराविरोधात तक्रार दाखल

भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी भटकल मशिदीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

बेंगळुरु- भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी भटकल मशिदीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. हेगडे हे उत्तर कनाडाचे खासदार आहेत. त्यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यानंतर सु मोटो अंतर्गत कुमाता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Case against BJP MP Anant Kumar Hegde over controversial remark on Bhatkal mosque)

कारवार एसपी विष्णुवर्षन यांनी सांगितलं की, अनंक कुमार हेगडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. द्वेषपूर्ण वक्तव्य आणि जिल्ह्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी भारतीय दंड संहिता १५३ (A) ( धार्मिक, वांशिक, जन्म, स्थान यावरुन दोन गटामध्ये अंशातता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे) नुसार तक्रार दाखल केली आहे.

हेगडे काय म्हणाले होते?

उत्तरा कनाडा येथे शुक्रवारी सभेला संबोधित करताना हेगडे म्हणाले होते की, '१९९२ मध्ये कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती. त्याच प्रमाणे भटकल मशिद नष्ट करायला हवी. बाबरी मशिदसारखं भटकल मशिदीची परिस्थिती होईल हे निश्चित आहे. हा निर्णय अनंतकुमार हेगडेचा नाही. पण, हा निर्णय हिंदू समाजाला आहे.' त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता.

हेगडे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर देखील टीका केली होती. सिद्धारामय्या सुरुवातीला म्हणाले होते की त्यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले नाही. त्यानंतर ते म्हणतात अयोध्येत जाणार नाही. मला त्यांना सांगायचंय की, तुम्ही जा किंना न जा. राम मंदिराचे उद्घाटन होणारच आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'अजिंक्यतारा, ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी २६८ कोटींचा निधी'; साताऱ्यातील ऐतिहासिक संवर्धनास गती येणार..

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्याला बनवा काहीतरी हेल्दी! आताच लिहून घ्या ज्वारीच्या पुलावाची सोपी रेसिपी

आजचे राशिभविष्य - 08 ऑक्टोबर 2025

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२०० कोटी! अतिवृष्टी, महापुराचा ‘या’ तालुक्यातील ४.६९ लाख शेतकऱ्यांचे नुकसान; तलाठ्यांकडे द्या ‘ही’ कागदपत्रे

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

SCROLL FOR NEXT