navy esakal
देश

गोपनीय माहिती लीक; Navy कमांडरसह चौघांना CBI कडून अटक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पाणबुडीशी संबंधित डेटा उघड केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नौदलाच्या (Navy) कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यासह (cbi arrests) दोन निवृत्त कर्मचारी आणि अन्य दोघाजणांना अटक केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव उघड करायला केंद्रीय तपास संस्थेने नकार दिला आहे. याप्रकरणी मागील महिन्यामध्ये कारवाईला सुरूवात झाली होती

तब्बल १९ ठिकाणांवर छापे

हे प्रकरण भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या किलो श्रेणीतील पाणबुडीशी संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी दिल्ली, मुंबई, नोएडा आणि हैदराबादेतील तब्बल १९ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणात गोळा करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांचीही तपास संस्थेकडून पडताळणी करण्यात येत आहे. यात सहभागी असलेला कमांडर दर्जाचा अधिकारी हा सध्या सुरू असलेल्या पाणबुडीच्या आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने दोन निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे उघड झाले असून त्यात बेकायदेशीर मार्गाने फायदा पोचविण्याच्या बाबीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

नौदलाकडूनही चौकशी

सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने हा भ्रष्टाचार उघड केला असून ही माहिती चुकीच्या लोकांच्या हाती तर लागली नाही ना हे देखील पडताळून पाहिले जाते आहे. सीबीआयच्या या चौकशीला नौदलाने देखील पूर्ण पाठिंबा दिला आहे. व्हाइस ॲडमिरलच्या माध्यमातून नौदलानेही याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: भन्नाट चेंडू... मोहम्मद सिराजने विंडीजच्या शतकवीराला 'गुडघे' टेकायला भाग पाडले; नावावर मोठा विक्रम

भारत-पाकिस्तानला 'ही' भीती दाखवली अन् युद्ध थांबलं ? ट्रम्प यांनी टाकला नवा बॉम्ब, खळबळजनक दावा

Diwali Window Cleaning Tips: या दिवाळीत खिडक्या करा चमकदार! घरगुती सोप्या उपायांनी मिळवा नवीनसारखी झळाळी

Mumbai Water Supply: मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत! पंजरापूर पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड, दुरुस्तीचे काम सुरू

Nashik Pushkar Bangla : फसवून बळकावलेला 'पुष्कर बंगला' अखेर पोलिसांच्या ताब्यात; अंबड पोलिसांकडून मालमत्ता सील

SCROLL FOR NEXT