Offices
Offices 
देश

Covid-19 : केंद्र सरकारचे आता ऑफिससाठी नवीन नियम; वाचा सविस्तर

वृत्तसंस्था

Corona Updates: नवी दिल्ली/पुणे : पुण्यासह जवळपास सर्वच शहरी भागांमध्ये नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरवात झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने खबरदारी म्हणून आतापासूनच पावले उचलण्यास सुरवात केली आहे.  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑफिसमध्ये कोविड-१९चा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून नवे नियम जारी केले आहेत. याबाबतचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यानुसार, ऑफिसमध्ये एक किंवा दोन प्रकरणे (कोविड केसेस) आढळून आल्या, तर संबंधित व्यक्तीने गेल्या ४८ तासांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी भेट दिली आहे, अशा सर्व जागांचे निर्जंतुकीकरण करावे, आणि त्यानंतरच नियमावलीनुसार ऑफिस कामांना सुरवात करावी, असे शनिवारी (ता.१३) प्रसिद्ध करण्यात आलेल्या एसओपी (Standard Operating Procedures) मध्ये नमूद करण्यात आले आहे. 

नव्या नियमावलीमध्ये (एसओपी) काय म्हटले आहे ते जाणून घ्या -

- जर कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येत कोविड-१९ प्रकरणे आढळून आल्यास संपूर्ण ब्लॉक किंवा इमारतीचे निर्जंतुकीकरण होईपर्यंत काम सुरू करू नये. 
- कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुपरवायझर अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी आणि त्यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत ऑफिसमध्ये हजर राहू नये. अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात यावी. 
- वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता कंटेन्मेंट झोनमधील सर्व ऑफिस बंद राहतील. 
- कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या परिसरातील कर्मचाऱ्यांना प्रवेश द्यावा, तसेच दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे आवश्यक आहे. 

- संबंधित व्यक्तींनी नाक आणि तोंड योग्यरित्या झाकले जाईल, अशा प्रकारचे मास्क वापरावेत. तसेच वारंवार मास्क किंवा चेहऱ्याला स्पर्श करू नये. 
- तसेच कमीतकमी ४० ते ६० सेकंद हात साबणाने स्वच्छ धुवावेत. जेथे शक्य असेल तेथे अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करावा. 
- शक्य तेवढ्या मीटिग्ज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात. तसेच जास्त संख्येत लोक जमतील अशा प्रकारचे कार्यक्रम टाळावेत. 
- ज्या ऑफिस परिसरात कॉरिडॉर्स, लिफ्ट, इलेव्हेटर्स, पार्किंग, कॅफे, कॅन्टीन्स, कॉन्फरन्स हॉल यांसारख्या जागा आहेत, अशा ठिकाणी कोविड-१९ वेगाने पसरतो. 
- कोरोनाला वेळीच आळा घालण्यासाठी आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर आणि परिणामकारक पावले उचलणे गरजेचे आहे. 
- ऑफिसच्या प्रवेशद्वारांवरच सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य आहे. 

- ऑफिस दिवसातून कमीत कमी दोनवेळा स्वच्छ करावे. 
- लिफ्टमध्ये लोकांची संख्या मर्यादित राहील आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील, अशा प्रकारे नियोजन करावे. 
- वेंटिलेशनसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑफिसमधील एसीचे तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवावे. तसेच सापेक्ष आर्द्रता ४०-७० दरम्यान असावी. ऑफिसमध्ये ताजी आणि खेळती हवा राहील, यादृष्टीने प्रयत्न करावेत. 
- दरवाज्याची कडी, लिफ्टची बटणे, बेंच, वॉशरूम अशा ठिकाणी १ टक्के सोडीयम हायपोक्लोराइट वापरून साफसफाई करणे आवश्यक आहे. 
- ऑफिसबाहेर गेल्यावरही दुकान, स्टॉल्स, कॅफे किंवा कॅन्टीन अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले पाहिजे. 

- कर्मचाऱ्यांनी त्यांचे तापमान नियमितपणे तपासावे, तसेच श्वसनासंबंधी लक्षणांची तपासणी करावी. जर त्यांना बरे वाटत नसले, फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
- या व्यतिरिक्त कर्मचारी आणि वेटर्स यांनी मास्क, हँडग्लोव्ह्ज आणि आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ६ फूट अंतर राहील, अशी बैठकव्यवस्था करावी, असे नव्या एसओपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SEBI Decision: शेअर बाजारातील व्यवहाराचे तास वाढणार का? सेबीने नेमकं काय सांगितलं

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT