Agnipath Scheme News
Agnipath Scheme News sakal
देश

'अग्निपथ योजने'विरोधात खोट्या बातम्या, ३५ व्हाॅट्सअप ग्रुपवर बंदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रविवारी (ता.१९) ३५ व्हाॅट्सअप ग्रुपवर बंदी घातली आहे. सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेबाबत खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल वरील व्हाॅट्सअप (Whatsapp) ग्रुपवर बंदी घालण्यात आली आहे. सरकार चुकीची माहिती पसरवणाऱ्या आणि हिंसेला उत्तेजन देणाऱ्यांचा शोध घेत आहे. जवळपास १० जणांना खोट्या बातम्या पसरवणे आणि तरुणाईची दिशाभूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Centre Bans 35 Whatsapp Groups For Spreading Fake News About Agnipath Scheme)

प्रेस इन्फर्मेशन ब्युरोकडून वस्तुस्थिती तपासली जात असून योजनेसंबंधित माहितीची पडताळणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी घोषणा झाल्यानंतर देशातील वेगवेगळ्या भागात अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) हिंसक निदर्शने सुरु झाली आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी भारतीय तरुणांसाठी संरक्षण दलात नोकरी भरतीसाठी योजनेची घोषणा केली होती.

या अग्निपथ योजनेत साडेसतरा ते २१ वयोगटातील तरुणांना सैन्यदलात भरती होता येते. मात्र आता तरुणांच्या विरोधानंतर वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून ती २३ पर्यंत करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT