Weather Update ANI
देश

Weather Update: छत्री, रेनकोट सोबत ठेवा! पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट

Weather Update: आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशासह अनेक राज्यातील हवामान मोठा बदल झाला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाने हजोरी लावली तर काही भागामध्ये कडाक्याची थंडी आहे. अशातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. परिणामी तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. अशातच येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर लक्षद्वीपमध्येही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि कर्नाटक किनारी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या अनेक ठिकाणी थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, येत्या शनिवारपासून (ता. ६) हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी

एकीकडे राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे तर दुसरीकडे दाट धुक्यामुळे दृश्यमानताही कमी आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमानसेवेवर परिणाम होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

डोंगरावर बर्फवृष्टीमुळे थंडी वाढत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी म्हणजेच ४ जानेवारीला पारा खाली येईल. या काळात किमान तापमान 7 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहील आणि सकाळी हलके ते मध्यम धुके पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Latest Marathi News Live Update : नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

IPL 2026 Qualifier 2: गुजरात टायटन्स - राजस्थान रॉयल्स, सामना रद्द झाल्यास काय? RCBविरुद्ध फायनलमध्ये कोण खेळणार?

SCROLL FOR NEXT