देश

चंद्रकांत पाटील गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी? कोणती नावे आहेत चर्चेत?

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर गुजरातमधील अनेक नेत्यांची नावं सध्या चर्चेत आलेली आहेत. सध्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला देखील मुख्यमंत्र्यांची शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे या चर्चेत एक मराठमोळं नाव आघाडीवर आहे. सध्या गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव नव्या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे.

आज मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली आणि त्यांनी आपला राजीना सोपवला आहे. रुपाणी यांनी या राजीनाम्यामागचे नेमके कारण स्पष्ट केलेलं नाहीये. मात्र गुजरात काँग्रेसचे विजय रुपाणी यांना भारतीय जनता पक्षाचे अपयश लपवण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आला असल्याची टीका केली आहे. रुपाणी यांच्या रुपाने गेल्या काही दिवसात भाजपच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांचा असा तडकाफडकी राजीनामा झाला आहे.

याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी देखील अशाच धक्कादायक पद्धतीने राजीनामा दिला होता. तर त्याआधी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावरुन तिरथ सिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागला होता.

गुजरात विधानसभेची निवडणुक पुढील वर्षी होणार आहे. त्याच्या १ वर्ष आधीच रुपाणी यांच्या राजीनाम्यामागे काय गौडबंगाल आहे, याबाबत चर्चा सुरु आहेत. आता उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले जाते की नवीन व्यक्तीवर जबाबदारी दिली जाते, ते पाहणं निर्णायक ठरणार आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं तर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पहिला मराठी माणूस येऊ शकतो. त्यामुळं महाराष्ट्रातून देखील चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती मिळतेय.

विजय रुपाणी यांची राजकीय कारकीर्द

सध्या म्यानमारमध्ये असलेल्या बुरमामध्ये २ ऑगस्ट १९५६ रोजी एका जैन कुटुंबात विजय रुपाणी यांचा जन्म झाला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेल्या विजय रुपणी यांच्या राजकीय कारकिर्दीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश करत १९७१ मध्ये जन संघासोबत देखील काम सुरु केले. १९७६ साली आणीबाणीच्या काळात ११ महिने ते तुरुंगात होते. त्यानंतर १९८७ साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते. पुढे पहिल्यांदाच राजकोट शहराचे महापौर झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षातील वेगवेळ्या पदावर काम करत संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT