Chandrayan-3 Ritu Karidhal Story  esakal
देश

Chandrayan-3 : चांद्रयान चंद्रावर उतरवण्याची जबाबदारी घेणाऱ्या रितू करिधल कोण आहेत?

Who is Ritu Karidhal: चंद्रावर चांद्रयान उतरवण्याच्या या मोहिमेची जबाबदारी रितू करिधल सांभाळत आहेत

सकाळ ऑनलाईन टीम

Chandrayan-3 Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO आपली महत्त्वाकांक्षी चांद्रयान मिशन-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित करणार आहे.

हे यान आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल, जे 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकते. चंद्रावर चांद्रयान उतरवण्याच्या या मोहिमेची जबाबदारी रितू करिधल सांभाळत आहेत.

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथील रितू करिधल यांना भारतातील रॉकेट वुमन म्हणून ओळखले जाते. अंतराळ क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता, इस्रोने रितू यांना चांद्रयान-3 चे मिशन डायरेक्टर बनवले आहे.

या अगोदर त्या चांद्रयान-2 सह अनेक मोठ्या अंतराळ मोहिमांचा भाग राहिल्या आहेत. विशेष म्हणजे रितू करिधल या त्या वैज्ञानिकांपैकी एक आहे ज्यांना इस्रोचा यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला आहे.

रितू करिधल या मूळच्या लखनौच्या असून, त्या आत्ता राजाजीपुरम येथे राहतात. रितूने त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौ येथील सेंट अग्नीज स्कूलमध्ये केले. यानंतर त्यांनी नवयुग कन्या विद्यालयातून शिक्षण घेतले. लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी केल्यानंतर, रितू यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमटेक करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर गाठलं.

इस्रोसाठी पीएचडी सोडली

एमटेक केल्यानंतर, रितू करिधलने पीएचडी करण्यास सुरुवात केली आणि एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली. दरम्यान 1997 मध्ये, स्टारसनच्या अहवालानुसार, त्यांनी इस्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. तिथे त्यांची नियुक्ती झाली.

अडचण अशी होती या नोकरीसाठी त्यांना पीएचडी सोडावी लागणार होती. ज्यासाठी त्या तयार नव्हत्या. प्रोफेसर मनीषा गुप्ता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पीएचडी करत होत्या, त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी रितूला इस्रोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

मंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली

रितू करिधलला यांची पहिली पोस्टिंग यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये झाली. येथील त्याच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. 2007 मध्ये त्यांना इस्रो यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला होता. हा तो काळ होता जेव्हा मंगळयान मोहिमेचे काम सुरू होणार होते.

एका मुलाखतीत रितू करिधलने सांगितले होते की, 'अचानक मला सांगण्यात आले की मी आता मंगळयान मोहिमेचा एक भाग आहे, हे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण उत्साहवर्धकही होते, कारण मी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग बनले होते. (Moon)

अशा प्रकारे चांद्रयान-3 ची जबाबदारी मिळाली

रितू करिधल या चांद्रयान-२ च्या मिशन डायरेक्टर होत्या. त्यांचा अनुभव पाहता 2020 मध्येच इस्रोने ठरवले होते की चांद्रयान-3 ची मोहीमही रितूच्या हातात असेल. या मिशनचे प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल आहेत.

याशिवाय चांद्रयान-2 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर एम वनिता यांना या मिशनमध्ये डेप्युटी डायरेक्टरची जबाबदारी देण्यात आली आहे, जे पेलोड, डेटा मॅनेजमेंटचे काम सांभाळत आहेत. (Space Station)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT