Satish Agnihotri esakal
देश

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी सतीश अग्निहोत्रींची रेल्वेकडून हकालपट्टी

सकाळ डिजिटल टीम

रेल्वेनं संचालक सतीश अग्निहोत्री यांची सेवा समाप्त केलीय.

नवी दिल्ली : रेल्वेनं नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक (MD) सतीश अग्निहोत्री (Satish Agnihotri) यांची सेवा समाप्त केलीय. अग्निहोत्री सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिलीय. अग्निहोत्री यांचा कार्यभार NHSRCL प्रकल्प संचालक राजेंद्र प्रसाद यांच्याकडं तीन महिन्यांसाठी देण्यात आलाय, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

NHSRCL हा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांच्या (Railway Project) अंमलबजावणीसाठी भारत सरकार आणि भागीदार राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे. ही मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.

अग्निहोत्रींवर पदाच्या गैरवापरासह अनेक आरोप

अधिकृत पदाचा गैरवापर आणि खासगी कंपनीकडं अनधिकृतपणे निधी हस्तांतरित करणं यासह अग्निहोत्रींवर अनेक आरोप आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते म्हणाले, अग्निहोत्रींच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय लोकपाल न्यायालयाच्या 2 जूनच्या आदेशानंतर आला आहे. या आदेशात एनएचएसआरसीएलच्या माजी एमडीनं एका खासगी कंपनीसोबत एकमेकांच्या फायद्यासाठी केलेल्या कथित कराराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले होते.

अग्निहोत्री यांनी रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (RVNL) CMD म्हणून नऊ वर्षांच्या कार्यकाळात ही कामं केल्याचा आरोप आहे. अग्निहोत्री यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत कोणताही गुन्हा करण्यात आला आहे की नाही हे शोधण्यासाठी लोकपाल न्यायालयानं सीबीआयला निर्देश दिले होते. तसंच, चौकशी अहवाल सहा महिन्यांत किंवा 12 डिसेंबर 2022 पूर्वी लोकपाल कार्यालयात सादर करावा, असं निर्देशांमध्ये म्हटलंय.

सरकारी नियमांचं उल्लंघन

अग्निहोत्री यांनी निवृत्तीनंतर वर्षभरातच एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केल्याचा आरोपही अधिकाऱ्यांनी केलाय. हे सरकारी नियमांचं उल्लंघन आहे, जे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना केंद्राच्या परवानगीशिवाय सेवानिवृत्तीनंतर एक वर्षापूर्वी कोणतीही व्यावसायिक नियुक्ती स्वीकारण्यास प्रतिबंधित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! थेट BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; राज्यभर कारवायांचा धडाका

Commonwealth Games 2026: जय हो! राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचं पदक पक्कं झालं; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : 'युवकांच्या भविष्यासाठी राजकारण नको; चर्चेत अडथळे आणू नका', सर्व पक्षांना किरेन रिजिजू यांचे आवाहन

Solapur News: मंगळवेढ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध

IND vs ZIM 1st T20I : पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का, फलंदाजाची दुखापतीमुळे माघार, बोर्डाने जाहीर केली रिप्लेसमेंट... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT