Charles Sobhraj  Sakal
देश

Charls Shobraj: शोभराज अनेकदा पाकला गेला, मसूदलाही भेटला! तुरुंगातून बाहेर येताच केले धक्कादायक खुलासे

हत्येच्या प्रकरणांमध्ये आपण निर्देष असल्याचा दावाही त्यानं केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Charls Shobraj: फ्रान्सचा बिकिनी किलर चार्ल्स शोभराज शुक्रवारी १९ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेपाळच्या तुरुंगातून बाहेर आला. तसेच नेपाळ सरकारनं त्याला थेट फ्रान्सकडे रवाना केलं. दरम्यान, बाहेर आल्यानंतर त्यानं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये त्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. (Charles Shobraj Pakistan Connection and many revelations were made after coming out of prison in Nepal)

चार्ल्स शोभराज हा अनेकदा पाकिस्तानला गेला असून खतरनाक दहशतवादी मसूद अजहरलाही भेटला आहे. शोभराजनं सन २००३ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या अटकेपासून माहिती दिली. शोभराज सन २००० ते २००३ दरम्यान अनेकदा पाकिस्तानला गेला तसेच तिथं तो दहशतवादी मसूद अजहरला देखील भेटला.

मसूदच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्यानंतर शोभराज म्हणाला, तुम्हाला याबद्दल आधीच माहिती आहे. इंडियान एअरलाईन्सच्या हायजॅकच्या घटनेनंतर मसूदची भारतानं सुटका केली होती. त्यावेळी इंडियन एक्स्प्रेसनं माझ्या आणि सरकारच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. त्यावेळी जसवंत सिंह थेट माझ्या संपर्कात होते. सर्वात आधी त्यांनी पॅरिसमध्ये मला भेटण्यासाठी दूत पाठवला होता. त्या भेटीनंतर मी मसूदची संघटना हरकत उल अन्सारच्या लोकांशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी प्रवाशांना सोडण्यास नकार दिला. पण ११ दिवस प्रवाशांना ते काहीही करणार नाहीत असं वचन मी त्यांच्याकडून घेण्यात यशस्वी ठरलो होतो.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

नेपाळच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विमान प्रवासात एएफपीला दिलेल्या मुलाखतीत चार्ल्स शोभराजनं सांगितलं की, "नेपाळमधील दोन खुनांच्या केसमध्ये मी निर्दोष आहे. त्यामुळं मला याचं चांगलही आणि वाईट वाटत नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे या सर्व केसेस उभ्या करण्यात आल्या आहेत. कोर्टाच्या न्यायाधिशांनी एकाही साक्षीदाराला न तपासता तसेच कोणालाही कोर्टात हजर राहण्याची नोटीस न देता त्यांनी निकाल जाहीर केला"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT