Chhatrapati Sambhaji Maharaj esakal
देश

Chhatrapati Sambhaji Maharaj : छ. संभाजी महाराजांची संपूर्ण वंशावळ जाणून घ्या एका क्लिकवर

इतिहासातून अनेक व्यक्तींचा उल्लेख नामशेष होत चाललेला आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांत कोरलं गेलंय यात काही वादच नाहीये. त्यांचा इतिहास त्यांची कारकीर्द संपूर्ण जगाला माहितीये. मात्र आज आपण संभाजी राजे यांच्याविषयीचा इतिहास आज जाणून घेणार आहोत. आज त्यांची पुण्यतिथी आहे. इतिहासातून अनेक व्यक्तींचा उल्लेख नामशेष होत चाललेला आहे. त्यामुळे अनेक थोर पुरुषांचे आपल्याला इतिहास देखील माहीत होत नाही आणि त्यांच्या वंशजांविषयीची कल्पनाही बरेच जणांना नाही.

संभाजी राजे यांचे पुत्र शाहू महाराज होते. शाहूमहाराजांचा मुलगा रामराजे महाराज यांना दत्तक घेण्यात आले होते. शाहू उर्फ आबासाहेब महाराज हे रामराजे महाराजांचे दत्तक पुत्र आहेत. शाहू उर्फ आबासाहेब महाराज यांना तीन पुत्र आहेत. त्यांची नावे आहेत छ.प्रतापसिंह महाराज(शाहू उर्फ जंगली महाराज दत्तक),राजाराम, छ.शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज.शहाजी महाराजांना दोन दत्तक पुत्र होते.त्यांची नावे होती छ. व्यंकोजी महाराज आणि छ. राजाराम महाराज उर्फ आबासाहेब. व्यंकोजी महाराज यांचे पुत्र छ. प्रतापसिंह महाराज तर राजाराम महाराज यांचे पुत्र शिवाजी महाराज. प्रतापसिंह महाराजांचे दत्तक पुत्र म्हणजे छ. शाहू महाराज. शाहू महाराजांना छ.प्रतापसिमह, विजयसिंह, अभयसिंह आणि शिवाजी असे चार पुत्र होते. प्रतापसिंह महाराजांचे पुत्र छ. उदयनराजे आहेत.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले

छत्रपती संभाजी महाराज हे थोर मराठा योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुणे, महाराष्ट्रातील पुरंदर किल्ल्यावर झाला होता. संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणे बालपणापासूनच छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांची आज पुण्यतिथी असल्याने जाणून घेऊयात त्यांच्या काही महत्त्वाच्या बाबी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT