Chhattisgarh Assembly Election Sakal
देश

Chhattisgarh Assembly Election: छत्तीसगडमध्ये भाजपाची मुसंडी; काँग्रेसला मोठा धक्का, 7 मंत्री पिछाडीवर

Chhattisgarh Assembly Election: छत्तीसगडमध्ये 7 मंत्री पिछाडीवर आहेत

राहुल शेळके

Chhattisgarh Assembly Election: छत्तीसगडमधील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. भाजप आता काँग्रेसच्या पुढे गेली आहे. मोठी बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव अंबिकापूरमधून पिछाडीवर आहेत. सध्या भाजप 51 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे.

राजनांदगावचे डॉ. रमण सिंग, बिलासपूरचे अमर अग्रवाल, रायपूर दक्षिणेतील ब्रिजमोहन अग्रवाल, रायगडचे ओपी चौधरी हे सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. दुर्ग ग्रामीणमधून गृहमंत्री ताम्रध्वज साहू मागे आहेत, तर कावासी लखमा कोंटामधूनही मागे आहेत.

छत्तीसगडमध्ये 7 मंत्री पिछाडीवर आहेत

  1. मंत्री ताम्रध्वज साहू

  2. मंत्री मोहन मरकम

  3. मंत्री कावसी लखमा

  4. मंत्री मोहम्मद अकबर

  5. मंत्री अमरजीत भगत

  6. मंत्री रुद्र गुरु

  7. मंत्री अनिला भेडिया

यावेळी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील निवडणूक रंजक दिसत आहे. या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सीएम भूपेश बघेल हे स्वत: काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत, तर सीएम भूपेश यांचे पुतणे विजय बघेल हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. पाटणमधून काका आणि पुतण्या (मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि दुर्गचे खासदार विजय बघेल) यांच्यात निवडणूक लढत आहेत.

90 जागांच्या छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या. बहुतांश एक्झिट पोल काँग्रेसच्या सत्तेत परतण्याचा अंदाज वर्तवत आहेत, तर काही पोल काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीच्या लढतीचा अंदाज वर्तवत आहेत.

मात्र, छत्तीसगडमध्ये अशा काही जागा आहेत जिथे रोचक लढती पाहायला मिळत आहेत. छत्तीसगडमधील पाटण, राजनांदगाव, अंबिकापूर, रायपूर सिटी साऊथ, सक्ती, कोंटा, कोंडागाव, खरसिया, लोर्मी आणि भरतपूर-सोनहाट या जागांवर चुरशीची स्पर्धा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT