Rescue teams working at the Bilaspur train accident site in Chhattisgarh after a freight train collided with a passenger train, leaving several dead and injured.
esakal
Chhattisgarh Bilaspur train accident : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आज एक भीषण रेल्वे अपघात घडला. कोरोबा पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडी यांची जोरदार धडक झाली. ज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दहा जणांचा मृत्यू झालेला आहे. तर अनेकजण जखमी देखील आहेत. ही भीषण अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे विभागाच्या लाल खदान भागात झाला.
दुर्घटनेची माहिती मिळाताच रेल्वेची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतर संपूर्ण मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. साधारण दुपारी ४ वाजता हा अपघात झाला. ट्रेन क्रमांक ६८७३३ एका मालगाडीला धडकली.
वृत्तानुसार, ही टक्कर इतकी भीषण होती की त्यामुळे ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नल सिस्टीमचे मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की दुरुस्तीसाठी काही तास लागू शकतात, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
रेल्वेने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात सिग्नल बिघाड किंवा मानवी चूक ही संभाव्य कारणे असल्याचे दिसून आले आहे. प्रवाशांना कोणत्याही माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन त्वरित मदत आणि समन्वय सुनिश्चित करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.