Eknath Shinde Latest News Eknath Shinde Latest News
देश

मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण केले स्पष्ट; म्हणाले...

लवकरच विस्तार होणार या शिवाय कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Latest News नवी दिल्ली : दिल्लीत आयोजित बैठकीसाठी आलो आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत असते. दोन बैठकीत सहभाग घेणार आहे. दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) काहीही संबंध नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

शिंदे गट व भाजपचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. आज या गोष्टीला जवळपास दीड महिना होणार आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.

विस्तारावरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला कशाची भीती नाही, तुमचे सरकार योग्य आहे तर का करीत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला होता. मात्र, लवकरच विस्तार होणार या शिवाय कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही.

उलट दिल्ली दौऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. दिल्लीतून परवानगी मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार नाही, असे विरोध म्हणत आहे. यामुळे शनिवारी (ता. ६) दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

विस्तारात कोणतीही अडचण नाही

मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात कोणताही अडथळा किंवा अडचण नाही. लवकरच विस्तार केला जाईल. कोणतेही काम थांबलेले नाही. काम होत आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तारीख पे तारीख

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर फक्त तारीख मिळत आली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) विस्तार होईल अशी चर्चा असताना ७ ऑगस्टपर्यंत विस्तार केला जाईल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले होते. मात्र, त्यांनी अधिकृत तारीख सांगितली नव्हती. यामुळे विस्तार कधी होईल, असाच प्रश्न राजकारण्यांपासून सामान्यांचा तोंडून निघत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी लवकरच विस्तार होईल, असे म्हणून वेळ मारून नेली. मात्र, अधिकृत तारीख काही सांगितली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क, अजितदादांची ‘ती’ परंपरा जपली

Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुका, हसन मुश्रीफ काय म्हणाले

Gold Rate Today : सोनं पुन्हा महागलं! सर्वसामान्यांची निराशा, आठवड्यात तिसरी दरवाढ; पाहा आजचा ताजा भाव

Kolhapur Mayor : वर्षानुवर्षांचे स्वप्न साकार; भाजपच्या रूपाराणी निकम महापौर,महायुतीचा फडकला झेंडा

Rohit Pawar: पक्षावर बोलण्याचा मला भावनिक अधिकार; रोहित पवारांचे सुनील तटकरेंना उत्तर, मतदान केंद्रावर आठवणी सांगताना भावुक!

SCROLL FOR NEXT