up chief minister yogi adityanath  Team eSakal
देश

योगी पहिल्यांदाच लढवणार विधानसभेची निवडणूक?

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2022) लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलेलं नाही. माध्यमांशी अनौपचारीक संवाद साधत असताना त्यांनी ही माहिती दिल्यांचं एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तामधून समोर आलं आहे. कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहात? असे विचारले असता ते म्हणाले की, पक्ष सांगेल तिथूनच मी लढेन. कोणत्याही मतदार संघातून लढण्यास मी तयार असून, माझी वैयक्तिक कोणतीही पसंती नाही.

प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजप (BJP) विधानसभेच्या तीनशेहून अधिक जागा जिकंणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. योगी आदित्यनाथ यावेळी विधानसभा निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल.

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली दिसतेय. त्यात योगी आदित्यनाथ हे स्वत: विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. योगी आदित्यनाथ यांची ही पहिली विधानसभा निवडणूक लढवणार असून, यापूर्वी त्यांनी २०१४ लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१७ साली मुख्यमंत्री पदासाठी त्यांना भाजपकडून विधार परीषदेवर पाठवण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT