India and China Sakal
देश

चीन सीमावाद रशियाची मध्यस्थी?

परराष्ट्र प्रवक्ते बागची यांनी भाष्य टाळले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : चीनविरुद्धच्या सीमावादातील रशियाच्या कथित मध्यस्थीबाबत भारताने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. रशिया, भारत आणि चीनचे संवाद व्यासपीठ असलेल्या ‘रिक'' परिषदेत यासंदर्भात चर्चा होणार असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने भाष्य करण्यास नकार दिला. तिन्ही देशांमध्ये परराष्ट्र मंत्री पातळीवर झालेल्या चर्चेव्यतिरिक्त सांगण्यासारखे नवे काहीही नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

तीन देशांतील सहकार्यवृद्धीसाठी रिक शिखर परिषद लवकरच होणार असल्याची बातमी टास या रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे सहाय्यक युरी उशाकोव्ह यांचा हवाला देण्यात आला आहे. पुतीन यांनी नुकतीच चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात त्यांनी सहा डिसेंबरच्या भारत दौऱ्याबद्दलही माहिती दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. या संभाव्य त्रिपक्षीय शिखर बैठकीचा आणि सीमेवरील तणावाचाही संबंध जोडला जात आहे.

या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या मुद्द्यावर फारसे बोलण्यासारखे नसल्याचे स्पष्ट केले. रिकच्या व्यासपीठावर २६ नोव्हेंबरला तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली होती. त्याव्यतिरिक्त नवे काहीही नाही. रशियाशी भारताचे उत्तम संबंध आहेत, इतकीच टिप्पणी त्यांनी केली.दरम्यान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या पाच मध्य आशियाई देशांसमवेत भारत-मध्य आशिया संवाद १९ डिसेंबरला होणार आहे. बागची यांनी सांगितले की, ‘या पाचही देशांचे परराष्ट्र मंत्री भारत-मध्य आशिया संवादात सहभागी होणार आहेत. यामध्ये व्यापार, संपर्क आणि विकासासाठी सहकार्य यावर भर असेल.‘ अर्थातच, यात अफगाणिस्तानचाही मुद्दा चर्चेत असेल, असे संकेत बागची यांनी दिले.

अफगाणिस्तानमधील तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर जगभरात शांतता, दहशतवाद, अमली पदार्थांचा व्यापार याबाबत चिंता वाढली असताना मध्य आशियाला महत्त्व देण्यासाठी भारताचा प्रयत्न असून याच प्रकारचा संवाद ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन स्वरूपात झाला होता.

पाच राष्ट्रप्रमुख आमंत्रित

मध्य आशियातील पाच देशांच्या प्रमुखांना पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचे नियोजन भारताने केले आहे. याबाबतची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: "निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास अटक होणार..."; कोर्टाच्या निर्णयाने चित्र बदललं, CJI सूर्यकांत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर दौऱ्यात पंकजा मुंडेंनाही औद्योगिक प्रदूषणाचा फटका; वाहनांवर काळ्या धुळीचा थर

Traffic Rules: ई-चालान ४५ दिवसांत भरा, नाहीतर...; केंद्र सरकारकडून नवे ट्रॅफिक नियम लागू, वाहनचालकांसाठी इशारा

Police Misconduct : पोलिस कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; रुग्णांच्या बेडवर लोळले, डस्टबिनमध्ये लघवी केली अन्....

प्राजक्ता माळीने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक, म्हणाली...'त्याच्या बोलण्यातून कधीच चुकीचा शब्द...'

SCROLL FOR NEXT