Amit Shah esakal
देश

Amit Shah : भारताच्या एक इंचही जमिनीवर कब्जा करण्याचं धाडस कोणाच्यात नाही; अमित शाहांचा थेट चीनला इशारा

'आमचे आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर पहारा देत आहेत, त्यामुळं कशाचीही चिंता नाही.'

सकाळ डिजिटल टीम

'आमचे आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर पहारा देत आहेत, त्यामुळं कशाचीही चिंता नाही.'

बेंगळुरू : तवांगमध्ये (Tawang) भारतीय लष्कर (Indian Army) आणि चिनी सैनिकांत (Chinese Soldiers) झालेल्या चकमकीवरून अमित शाहांनी (Amit Shah) चीनला चांगलंच सुनावलंय.

सीमेवर ITBP जवान असताना LAC वर चीन काहीही करू शकतो असा विचार करण्याची मला गरज वाटत नाही, असं शाहांनी म्हटलंय. ITBP च्या निवासी आणि अनिवासी परिसरांच्या उद्घाटन समारंभात गृहमंत्री अमित शाह बोलत होते.

गृहमंत्री पुढं म्हणाले, 'आयटीबीपी हे आमचं सुरक्षा दल आहे, जे अतिदुर्गम भागात कार्यरत आहे. 42 अंश सेल्सिअस तापमानात देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी किती मजबूत मनोबल लागतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जेव्हा आमचे आयटीबीपी जवान सीमेवर तैनात असतात, तेव्हा भारताच्या एक इंच जमिनीवरही कोणाचं अतिक्रमण करण्याचं धाडस होत नाही.'

आयटीबीपीच्या समारंभात गृहमंत्री म्हणाले, भारताच्या विकासाच्या प्रवासात चांगला कायदा आणि सुव्यवस्था महत्त्वाची आहे. आमचे आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर पहारा देत आहेत, त्यामुळं कशाचीही चिंता नाही. ITBP जवानांचं शौर्य सर्वज्ञात आहे. म्हणूनच, लोक त्यांना 'हिमवीर' म्हणतात, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT