chirag paswan main.jpg 
देश

बिहारमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकतात, चिराग पासवान यांचा नाव न घेता भाजपवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा

पाटणा- लोक जनशक्ती पार्टीचा (लोजपा) शनिवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पक्षाच्या स्थापनेदिवशी लोजपाप्रमुख चिराग पासवान यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पप्पा (रामविलास पासवान) आता आपल्यात नाहीत. त्यामुळे आपल्या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या गैरहजेरीत पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत पक्षाला 24 लाख मते म्हणजेच सुमारे 6 टक्के मते मिळाली आहेत. यातून लोजपाचा विस्तार झाल्याचे स्पष्ट दिसते. बिहारमध्ये पक्षाने 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट' बरोबर कोणताच समझोता केलेला नाही. 

चिराग पासवान पुढे म्हणाले की, नवीन लोक जोडले गेल्याने पक्ष मजबूत झाला आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाकडे दोन पर्याय होते. 15 जागांवर निवडणूक लढवावी किंवा मैत्रीपूर्ण निवडणूक लढवावी. युतीमध्ये पक्षाला केवळ 15 जागा देण्यावर चर्चा सुरु होती. लोजपाच्या संसदीय समितीने हे मान्य केले नाही. त्यामुळे बहुतांश जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ते पुढे म्हणाले की, बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट संकल्पाबरोबर आपण एकट्याने 135 जागा लढवल्या होत्या. बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट या आपल्या अभियानाचे कौतुक करण्यात आले. आता आपल्याला आणखी तयारी करावी लागेल. 

पक्षाचे संस्थापक आदरणीय रामविलास पासवान यांनी मागील वर्षी पक्षाचे अध्यक्षपद माझ्याकडे सोपवले होते. त्यांनी आपला पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांना नेहमीच कोणाशी युती न करता पक्षाने एकट्याने निवडणूक लढवावी असे वाटत असत. 2020 च्या निवडणुकीने हे सिद्ध केले आहे की, लोजपाकडे एक मजबूत जनाधार आहे. त्याच्या आधारेच पुढील निवडणुकांमध्ये पक्ष एका नव्या उंचीवर जाईल. 

बिहार विधानसभा निवडणुका 2025 पूर्वीही होऊ शकतात. सर्वांनी 243 विधानसभा मतदारसंघाची तयारी आतापासूनच सुरु करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT