cipla cipremi covid 19 remdesivir
cipla cipremi covid 19 remdesivir 
देश

कोरोनावर आणखी एक औषध लवकरच; प्रसिद्ध फार्मा कंपनीने केली घोषणा

सुरज यादव

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत देशात 7 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावर अद्याप लस सापडलेली नसून काही रेमडेसिवीरचा वापर जगभरात केला जात आहे. भारतातही हेटेरोने रेमडेसिवीर बाजारात आणलं आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध फार्मा कंपनी सिप्लानेही रेमडेसिवीर लवकरच बाजारात उपलब्ध करून देणार आहे. कंपनीला डीसीजीआयने रेमडेसिवीर तयार करण्याची आणि विकण्याची परवानगी दिली होती. आता सिप्ला एक दोन दिवसांमध्ये औषध बाजारात आणणार असल्याचे समजते. 

सिप्लाच्या रेमडेसिवीर औषधाचं नाव सिप्रेमी असं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंपनीने सांगितलं की, औषधाची पहिली बॅच तयार झाली आहे. सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माला मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. बीडीआरने फिनिश्ड डोसेज आणि पॅकेजिंगसाठी सोवरेन फार्मासोबत डील केलं आहे. सिप्लाने दिलेल्या माहितीनुसार औषध एक दोन दिवसात लाँच करण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र याचे किती डोस तयार आहेत याची माहिती मिळू शकली नाही. सिप्ला त्यांचे सिप्रेमी हे औषध जवळपास 4 हजार रुपयांमध्ये विकण्याची शक्यता आहे. म्हणजेच हेटेरोपेक्षा 1 हजार 400 रुपये याची किंमत कमी असेल. 

डीसीजीआयकडून मंजुरी मिळाल्यानंतर हेटेरो ग्रुपने कोविफोर औषध तयार करण्यास आणि विकण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत फक्त त्यांचीच औषधे पुरवली जात होती. कंपनीने एका बाटलीची किंमत 5 हजार 400 रुपये इतकी ठेवली आहे. आतापर्यंत फक्त 20 हजार बाटल्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी वाढत असल्यानं त्याचा वापर गंभीर रुग्णांवर उपचारासाठी करण्यासाठी परवानगी दिली आहे. 

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे याची निर्मिती वाढण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या सात लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनामुळे देशात 20 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 2 लाख 59 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत औषधांचा काळाबाजार होत असल्याची माहितीही समोर येत आहे. एका रेमडेसिवीरसाठी 30 ते 40 हजार मोजले जात आहेत. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीनुसार, रेमडेसिवीरचे डोस सहा दिवसांऐवजी पाच दिवस देण्यात येतील. क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल फॉर कोविड 19 नुसार पहिल्या दिवशी कोरोनाच्या रुग्णाला इंजेक्शनमधून रेमडेसिवीर 200 एमजी डोस दिला जावा. तर पुढचे चार दिवस दररोज 100 एमजीची इंजेक्शन दिली जातात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT