Citizens took to the streets after the brutal murder of Kanhaiya Lal Citizens took to the streets after the brutal murder of Kanhaiya Lal
देश

Jaipur Murder | 'त्यांना फाशी द्या', कन्हैयालालच्या हत्येनंतर जयपूरमध्ये मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) वातावरण शांत पण तणावपूर्ण आहे. गुरुवारी उदयपूरमध्ये हजारो हिंदू समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून मूक मिरवणूक काढून संताप व्यक्त केला. तिरंगा आणि भगवे ध्वज घेऊन लोक रस्त्यावरून चालले होते. अनेकांनी पोस्टर घेऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. (Citizens took to the streets after the brutal murder of Kanhaiya Lal)

कन्हैयालालच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उदयपूरमध्ये (Udaipur) मूक मिरवणूक काढण्यात आली. टाऊन हॉलच्या आवारात ब्राह्मण, राजपूत, शीख, श्रीमाळी समाज, गौर समाज, खंडेलवाल यांच्यासह इतर समाजातील हजारो लोक जमले. येथून मिरवणुकीच्या स्वरूपात पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. धर्मगुरूंना अग्रस्थानी ठेवण्यात आले होते.

तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करीत मारेकऱ्यांना फाशीची मागणी केली. सर्वांनी शांततेने आपला निषेध व्यक्त करावा. धीर सोडू नका. कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा देऊ नका, असे आवाहन आयोजकांकडून सातत्याने करण्यात येत होते. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कन्हैयालालच्या हत्येमुळे (murder) निर्माण झालेला संताप पाहता उदयपूरच्या पोलिस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेट अजूनही बंद आहे. ‘सरकार कठोर कारवाई करीत आहे. सर्वांनी शांतता राखावी’, असे आवाहन राज्यातील जनतेला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.

सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी

कन्हैयालालच्या हत्येनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत गुरुवारी त्यांच्या घरी पोहोचले आणि शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. घरातील सदस्यांच्या व्यथा दूर करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री गेहलोत जेव्हा पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी ५१ लाखांचा धनादेश घेऊन आले तेव्हा त्यांनी कन्हैयालालच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT