Delhi Crime News esakal
देश

दिल्ली पुन्हा हादरली! तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार; सफाई कामगाराला अटक

श्रध्दा वालकर हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच आता राजधानी दिल्ली पुन्हा एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय.

सकाळ डिजिटल टीम

श्रध्दा वालकर हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच आता राजधानी दिल्ली पुन्हा एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय.

नवी दिल्ली : श्रध्दा वालकर हत्याकांडाचं (Shraddha Walker Murder Case) प्रकरण ताजं असतानाच आता देशाची राजधानी दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कालका पब्लिक स्कूलमध्ये (Kalka Public School) इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलंय.

शाळेतील एका सफाई कामगारावर विद्यार्थिनीसोबत हा अघोरी प्रकार घडवल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी सफाई कामगाराला अटक केलीय. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाहीये.

दिल्लीत याआधीही शाळेतील विद्यार्थिनींसोबत अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या वर्षी 6 ऑक्टोबरला दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात 11 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला होता. शाळेतील दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांवर एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार

पीडितेनं आपल्या जबाबात सांगितलं की, जुलै महिन्यात शाळेतील दोन मुलांनी माझ्यासोबत हा प्रकार घडवून आणला. मी वर्गात जात असताना मुलांची माझ्यासोबत टक्कर झाली आणि यानंतर दोन्ही मुलांनी माझ्यावर अत्याचार सुरू केल्याचं अल्पवयीन पीडितेनं सांगितलं. 'दोन विद्यार्थ्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मला शाळेच्या स्वच्छतागृहात नेलं आणि तिथं माझ्यावर बलात्कार केला.' दोन्ही आरोपी मुलं इयत्ता 11 वी-12 वीचे विद्यार्थी आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT