देश

अशोक गहलोत अजुनही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; सोनिया गांधींची घेणार भेट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कायम आहे. मात्र, राजस्थानातून त्यांना पाठिंबा देणाऱ्या ९० हून अधिक आमदारांच्या बंडामुळे गांधी कुटुंबीय त्यांच्यावर नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत अजूनही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत, ते नाकारले गेले नाहीत. अशोक गेहलोत हे लवकरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतील. अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे मान्य केले होते. राहुल गांधी यांनी 'एक व्यक्ती, एक पद' हे धोरण अवलंबले जाईल, असे स्पष्ट केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता.

राजस्थानमधील बदलाची औपचारिक घोषणा रविवारी गेहलोत यांच्या निवासस्थानी आमदारांच्या बैठकीत होणार होती. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मते, वेळ आणि ठिकाण मुख्यमंत्र्यांनीच ठरवलं होतं. मात्र गहलोत यांच्या घरी केवळ 20-25 आमदारच दिसले.

गेहलोत यांचे निकटवर्तीय मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी झालेल्या स्वतंत्र बैठकीला काँग्रेसचे बहुतांश आमदार उपस्थित होते. नंतर ते एका विशेष बसमधून सभापतींच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची धमकी दिली. अशोक गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावरून त्यांनी ही धमकी दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT