gurmeet ram rahim parole news in Marathi 
देश

पॅरोलवर असलेल्या राम रहीमचा म्युझिक व्हिडीओ लॉन्च; मुख्यमंत्री खट्टर म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

चंडीगढ़ : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या पॅरोलवरून निर्माण झालेल्या वादावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच तुरुंगांचे स्वतःचे नियम आहेत. यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असं ते म्हणाले. (gurmeet ram rahim parole news in Marathi)

भाजपशासित हरियाणातील पंचायत निवडणुकीआधी बलात्कार आणि हत्येप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमच्या 40 दिवसांच्या पॅरोलवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

पॅरोलवर सुटलेल्या राम रहीमने यूपीतील बरनावा आश्रमात 5 वर्षानंतर पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली. या दरम्यान त्याने दिवाळीचा म्युझिक व्हिडिओ लाँच केला. 3.52 मिनिटांचा हा व्हिडिओ यूट्यूबवर रँकिंगमध्ये आहे. 2017 मध्ये दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जानंतर गेल्या आठवड्यात त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

पंजाबी भाषेत लाँच करण्यात आलेल्या ३ मिनिट ५२ सेकंदाच्या गाण्यात राम रहीमने स्वतः काम केले आहे. या व्हिडीओमध्ये राम रहीमचे जुने शॉट्स त्याचे गुरु शाह सतनाम यांच्यासोबत चित्रीत करण्यात आले आहेत. राम रहीमने त्याला आपलं नवं भजन म्हटलं आहे. त्याचबरोबर या गाण्याचे कंपोझिंग, एडिटिंग, संगीत यासह सर्व कामे स्वत: करण्याचा दावा त्याने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT