चंदीगड Farmer Protests: हरियाणात मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (CM Manohar Lal Khattar) यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी कथितरित्या खट्टर यांच्या ताफ्याला अडवले आणि त्यांच्या गाडीवर काठ्या फेकल्या होत्या. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी 13 शेतकऱ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि दंगल उसळवण्यासोबत अनेक आरोपांसह गुन्हा दाखला केला आहे.
खट्टर अंबालामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, येथे एका शेतकऱ्याच्या गटाने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. कथितरित्या काही शेतकऱ्यांनी खट्टर यांच्या ताफ्याला ब्लॉक केले आणि त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. त्यानंतर काही वेळाने पोलिस खट्टर यांची गाडी बाहेर काढू शकले.
मोदींनी सांगितलेली साडीच्या पदराची गोष्ट खोटी; तृणमूल काँग्रेसनं भाषणावर घेतला...
DSP मदन लाल यांनी यासंबंधी माहिती दिली. मंगळवारी जेव्हा मुख्यमंत्री शगून पॅलेसमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा काही शेतकऱ्यांच्या गटाने त्यांचा गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 13 शेतकऱ्यांविरोधात आयपीसी 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यासंबंधी अधिक तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा सरकारने अंबाला एसपी राजेश कालिया यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी हामिद अख्तर अंबालाचे नवे एसपी झाले आहेत. राजेश कालिया यांना चंदीगडमध्ये एसपी सेक्युरिटी सीआयडी नियुक्त करण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या जवळजवळ 1 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तसेच देशातील इतर भागातही शेतकऱ्यांकडून निदर्शने होत आहेत. सरकारने नव्याने आणलेले आणि दुरुस्ती केलेले तीन कायदे मागे घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण, सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दाखवली आहे, पण कायदे रद्द करण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने रोध कायम आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.