pramod sawant sakal
देश

काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक होते; प्रमोद सावंत यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

पणजी - गोव्यात बुधवारी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये येण्यास तयार होते. नरेंद्र मोदीजी देशात चांगले काम करत आहेत. गोव्यातही चांगले काम होत असून डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या आमदारांचे स्वागतच केले आहे.

राहुल गांधी 'भारत जोडो यात्रा' करत असताना हे मिशन पार पडले आहे. यासंदर्भात सावंत म्हणाले की, 'काँग्रेस छोडो यात्रा' गोव्यातून सुरू झाली आहे, राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहे. मात्र गोव्यात काँग्रेस छोडो यात्रा सुरू झाली आहे. काँग्रेसचे उर्वरित नेतेही पक्ष सोडणार असून देशहितासाठी ते भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात सामील होतील, असंही सावंत यांनी म्हटलं.

काँग्रेसचे तीन आमदार कसकाय सुटले, त्यांच्याशी संपर्क झाला नाही का? या प्रश्नावर सावंत म्हणाले, "काँग्रेसचे आमदार कोणत्याही पूर्व अटीशिवाय भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नव्हता. त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा होता. काँग्रेसमध्ये आता कोणतेही नेतृत्व उरले नाही. मी दिल्लीला जाणार असून प्रवेश केलेल्या आमदारांमुळे सध्या मंत्रिमंडळात फेरबदलाची कोणतीही योजना नसल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

Latest Marathi News Live Update: आत्मसमर्पणाच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्याची हत्या

SCROLL FOR NEXT