UP CM Yogi Adityanath criticized Asaduddin Owaisi in Delhi  
देश

'एक दिवस ओवेसीही हनुमान चालिसा म्हणताना दिसतील'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी सुरू असलेल्या प्रचारसभा या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच गाजत आहेत. रोज बड्या बड्या नेत्यांकडून काही ना काही वादग्रस्त वक्तव्य ऐकू येतं. त्यातही भाजपचे नेते केजरिवालांबाबत आक्षेपार्ह बोलताना दिसतात. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केवळ केजरीवाल यांच्याबाबतच नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निषाणा साधला आहे. 

दिल्लीतील कियारी येथील सभेत बोलताना म्हणाले की, 'दिल्ली विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी अरविंद केजरीवालांनी हनुमान चालिसा म्हणायला सुरवात केली आहे. आता पुढे बघा काय काय होईल, एक दिवस ओवेसीही हनुमान चालिसा म्हणताना दिसतील.' त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशा प्रकारे थेट ओवेसींवर टीका केल्याने आता पुन्हा वाद निर्माण होणार अशी शक्यता आहे. 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारों को, गोली मारो सालों को' अशा प्रकारच्या घोषणा उपस्थितांकडून वदवून घेतल्या होत्या. तसेच कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी 'गांधीजींचा स्वातंत्र्य संग्राम हा ड्रामा आहे,' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT