cm yogi adityanath amit shah political news 
देश

Yogi Govt UP : योगी सरकारमध्ये नाराजीनाट्य, 2 बडे नेते शहांकडे करणार तक्रार

CM योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

CM योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली आहे.

मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राजकारण रंगत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सत्ता मिळवली आहे. मात्र आता काही राजकीय कारणांमुळे योगी सरकारच्या मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य समोर आले आहे. (cm yogi adityanath amit shah political news)

काँग्रेसमधून भाजपात (BJP) दाखल झालेले जितीन प्रसाद आणि दिनेश खाटीक हे मंत्री योगी सरकारच्या कारभारावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. दिनेश खाटीक हे जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री असून ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपल्या आदेशाचे अधिकाऱ्यांकडून पालन होत नसल्याने खाटीक नाराज असून स्वतंत्र देव सिंह हे या विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत.

दरम्यान, दोन्ही मंत्र्यांचा फोन मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बंद येत होता. या महिन्याच्या सुरूवातीला योगी सरकारने प्रसाद यांच्या विभागाची झाडाझडती घेतली आहे. तीन सदस्यांच्या समितीने विभागातली बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचा अहवाल दिला आहे. त्याचा ठपका पांडे यांच्यावर ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. या बदलीच्या पार्श्वभूमीवर जितीन प्रसाद हे बुधवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे.

या चौकशीसंदर्भात ते शहा यांच्याकडे तक्रार करण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रसाद उपस्थित होते. पण त्यानंतर ते माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रिपद आहे. त्यांचे ओएसडी अनिल कुमार पांडे यांच्या बदलीवरून प्रसात संतापले असल्याची बातमी आहे. पांडे यांना राज्यसेवेतून पुन्हा केंद्रीय सेवेत पाठवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे, असे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT