Coimbatore Car Bombing Case esakal
देश

Coimbatore Blast Case : NIA ची मोठी कारवाई, तीन राज्यांत 60 ठिकाणी छापेमारी

कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणी (Coimbatore Car Bombing Case) राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सक्रिय झालीये.

सकाळ डिजिटल टीम

प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित संशयितांना पकडण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणी (Coimbatore Car Bombing Case) राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सक्रिय झालीये. एनआयएचं पथक तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, NIA अधिकाऱ्यांनी 60 ठिकाणांचा शोध घेतलाय. प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित संशयितांना पकडण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे कोईम्बतूर कार स्फोट प्रकरण?

गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी कोईम्बतूरच्या संगमेश्वर मंदिरासमोर कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात 25 वर्षीय जेमशा मुबीनचा मृत्यू झाला. जेमशा त्याच्या इतर साथीदारांसह दक्षिण भारतातील अनेक भागात बॉम्बस्फोटांचा कट रचत असल्याचं तपासात समोर आलंय.

स्फोटकांचा मोठा साठा जप्त

पोलिसांना जेमशाच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा सापडला होता. झडतीदरम्यान कोईम्बतूर रेल्वे स्टेशन, शहर पोलीस आयुक्त कार्यालय, कोईम्बतूर जिल्हाधिकारी कार्यालय, रेसकोर्स आणि व्हिक्टोरिया हॉलचे नकाशेही सापडले. जेमशा ISIS च्या संपर्कात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

कर्नाटकातील मंगळुरूमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑटो रिक्षात प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटात आरोपी मोहम्मद शारिक हा देखील जखमी झाला. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी शारिक बराच काळ फरार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२व्या वर्षी हरवलेला मुलगा २५व्या वर्षी परतला; गावात गेला तर घर नव्हते, पण आई दिसली… नंतर जे घडलं ते शब्दांच्या पलीकडचं

Maharashtra Election Update : राज्यातील राजकारण ढवळून निघणार! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कधीही होणार जाहीर? महत्त्वाची अपडेट समोर...

Viral Video : सीमेवर ड्युटी करताना स्वत:चाच वाढदिवस विसरला फौजी, मुलीने व्हिडिओ कॉल केला अन्... व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखोंची मनं

PCMC Election : भाजपकडून दादा लक्ष्य! पिंपरीतील कारभारावरून बावनकुळे यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT