comedian Shyam Rangeela, Rajasthan, Petrol Pump,Sriganganagar, Surendra Agarwal, PM Modi, mimic artist, fuel prices hike, social media, petrol, diesel 
देश

इंधन दरवाढीवरुन PM मोदींची केली मीमिक्री; श्याम रंगीलाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल दराववाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मीमिक्री करणं कॉमेडियन श्याम रंगीला याला चांगलेच महागात पडणार आहे. याप्रकरणात आता त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकप्रिय कॉमेडियन श्याम रंगीला (Shyam Rangeela) याने  श्रीगंगानगर येथील हनुमानगड रोड परिसरातील पेट्रोल पंपाजवळ  (Petrol Pump) एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून श्याम रंगीला याने इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन मोदी सरकारवरची फिरकी घेतली होती. 

विशेष म्हणजे त्याने मोदींची नक्कल करत देशात सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीवर भाष्य केले होते. श्याम रंगीलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेट्रोल पंपाचे मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. 

श्याम रंगीलाने  16 फेब्रुवारीला सोशल प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अल्पावधीत याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 35 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 42 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे. या व्हिडिओमध्ये मजेशीर अंदाजात श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मीमिक्री केली होती.

या ठिकाणी पेट्रॉलच्या किंमतीने 100 रुपयांचा आकडा पार केला आहे. भाई-बहनो स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशी कोणतेच सरकारला जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. पेट्रोलला त्याची योग्य किंमत आम्ही मिळवून दिली, या आशयाचे भाष्य श्याम रंगीला याने संबंधित व्हिडिओमध्ये केले होते.  या व्हिडिओमुळे श्याम रंगीला याच्या अडचणी वाढल्या आहेत. 

ज्या पंपाजवळ श्याम रंगीला याने व्हिडिओ शूट केला त्या पंप मालकाने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. श्याम रंगीला याने कॉल केला होता. स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगत त्याने पेट्रोल पंपाजवळ फोटो काढण्याची परवानगी मागितली होती, असा आरोप पेट्रोल पंपाचे मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी रंगीलावर केला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : अमेरिका पाकिस्तानला मदत का करते? माजी CIA एजंटकडून स्वत:च्याच सरकारची पोलखोल; देशाला हादरवणारी माहिती समोर...

Divyang Niradhar Yojana: मोठी घोषणा! निराधार लाभार्थींना आता मिळणार महिन्याला 2500 रुपये; वाचा काय आहेत अटी?

Latest Marathi News Live Update: महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे बिलोली तालुक्यात अवैध वाळू तस्करीचा आरोप

Brazil Drug Bust : ट्रकच्या टायरमध्ये लपवला होता ३५० कोटींचा माल, चाणाक्ष कुत्र्यामुळे मोठे रॅकेट उघड, नेमकं काय घडलं?

राज्यात वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीवरही बोलले

SCROLL FOR NEXT