company paid menstrual leave to men to support their partners at bengaluru 
देश

पुरुषांनाही पगारी मासिक पाळी रजा मंजूर...

वृत्तसंस्था

बंगळूर : शहरामधील एका कंपनीने महिला कर्मचाऱयांना पगारी मासिक पाळी रजा मंजूर केली आहे. पण, महिला-पुरुष असा भेदभाव न करता पुरुषांनाही त्यांच्या पत्नीची काळजी घेता यावी, म्हणून पगारी रजा मंजूर केली आहे.

बंगळुरूमधील हॉर्सेस स्टेबल न्यूज या कंपनीने आपल्या कंपनीतील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजेची योजना लागू केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना त्यांच्या मासिक पाळीत दोन दिवस रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना त्यांच्या त्या दिवसात पुरेसा आराम मिळेल. रजेदरम्यान त्यांचा पगार कापला जाणार नाही. शिवाय, त्यांना 250 रुपये भत्ता दिला जाणार आहे. फक्त महिलाच नाही तर पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही अशी सुविधा आहे, जेणेकरून ते आपल्या जोडीदाराच्या मासिक पाळीत तिची काळजी घेतील. दरम्यान आजारपणासाठी दिल्या जाणाऱ्या रजेत या रजेचा समावेश नाही, तर ही स्वतंत्र रजा असणार आहे.

हॉर्सेस प्रोडक्शनच्या सहसंस्थापक सलोनी अगरवाल म्हणाल्या, 'महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत तीव्र वेदना आणि क्रॅम्प्स होतात. त्यामुळे महिलांसाठी ही योजना आहेच. पण, महिला-पुरुषांना समान संधी असावी, असादेखील आमचा उद्देश आहे. त्यामुळे पुरुषांसाठीदेखील आम्ही ही योजना लागू केली आहे. आमच्या कंपनीत अशी योजना सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. इतर कंपन्यांनाही आम्ही प्रोत्साहीत करत आहोत, त्यांनीदेखील अशी योजना त्यांच्या कंपनीत सुरू करावी. अशा उपक्रमामुळे आपण मासिक पाळीबाबत असलेला टॅबू तोडू शकतो, अशी मला आशा आहे. आमच्या कंपनीत 60% महिला आणि 40% पुरुष कर्मचारी काम करत आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT