crocodile death
crocodile death esakal
देश

मगरीचे नाही, हे तर मगरीसाठी अश्रू! गुजरातमध्ये भरली शोकसभा

सकाळ डिजिटल टीम

अरेच्चा..हे तर मगरीचे अश्रू..अशी म्हण आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. पण गुजरातच्या वडोदरामध्ये (vadodara) इथले नागरिक चक्क मगरीसाठी भावूक झाले होते. आणि तिच्यासाठी अश्रू वाहताना दिसले. हो हे खरं आहे. एका मृत मगरीसाठी (crocodile death) नागरिकांतर्फे शोकसभा (condolence meeting) भरविण्यात आली होती. अनेकदा आपण सोशल मिडियावरही पाहतो. की प्राणीप्रेमींकडून कुत्रा, मांजर किंवा गाय या प्राण्यांसाठी अनेकदा शोकसभा भरविण्यात येतात. पण इथे तर चक्क मगर एका हिंस्र प्राण्यासाठी शोकसभा भरविण्यात आली. काही प्राणी मित्रांनी तर चक्क मृत मगरीला क्रांतिकारक मंगल पांडे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. पण असे करण्यामागे नेमके कारण काय? वाचा सविस्तर...

मगरीची शोकसभा आयोजित करण्याचे नेमके कारण काय?

मगरीसाठी आयोजित केलेल्या शोकसभेत मृत मगरीचा फोटो लावून हार घालण्यात आला होता. वडोदरा भागात विश्वामित्री नदीत अनेक मगरींचा सहवास आहे. त्यापैकी एका मगरीचा मृत्यू झाला. ही मगर 10 फूटाची असून तिचे वजन तब्बल 150 किलो होते. 10 ऑगस्टला या मगरीचा मृतदेह आढळल्याने स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली. त्यानंतर त्या मगरीच्या मृत्यूनंतर स्थानिकांची चक्क शोकसभेचे आयोजन केले होते. इथले प्राणीमित्र सांगतात की, ही मगर जणू त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांपैकी एक होती, तिच्या मृत्यूनंतर या शोकसभेचे आयोजन केले आहे. अनेक नागरिकांनी त्यात हजेरी लावल्याचे सांगितले. नदीतील असणाऱ्या एकाही मगरीने आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीवर कधीच हल्ला केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मगरींचे संवर्धन व्हावे - प्राणीप्रेमी

तसेच या नदीत सर्रास कचरा फेकला जातो , ज्यामुळे प्रदूषण वाढते. नदी आणि मगरीच्या संवर्धनाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी या शोकसभेचे आयोजन केल्याचे इथले नागरिक सांगतात. या मगरीच्या मृत्यूनंतर देशात मगरींच्या संवर्धनाबद्दल नवी क्रांती उभी राहिल अशी आशा प्राणी मित्रांनी व्यक्त केली आहे. तसेच या नदीत खुप सार्‍या मगरी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT