Condom Packs with Party Names Esakal
देश

Condom Packs with Party Names: सत्तेसाठी काहीही... आता कंडोमच्या पाकिटांवरही निवडणुकांचा प्रचार; व्हिडिओ व्हायरल

Condom Packs with Party Names: निवडणुकीपूर्वी दारू, पैसे आणि साड्यांचे वाटप सर्रास केले जाते. मात्र, आता आंध्र प्रदेशातील राजकीय पक्षांनी घरोघरी कंडोमची पाकिटे वाटण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कंडोमच्या पाकिटावर पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नावही छापण्यात आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Condom Packs with Party Names: निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष काय करत नाहीत? निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून पैसे, दारू आणि साड्यांचे वाटप सर्रासपणे केले जाते. पण, हे प्रकरण इथेच थांबलेले नाही. दारू आणि साडीपाठोपाठ आता कंडोमचाही निवडणूक घोषणांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

हा पराक्रम आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आला आहे, जिथे राज्यातील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी कंडोमच्या पॅकेटवर निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव छापून ते घरोघरी वाटल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

घरोघरी केले कंडोमचे वाटप

व्हायरल व्हिडिओमध्ये, कामगार सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष टीडीपी या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेली कंडोमची पाकिटे वाटताना दिसत आहेत. मतदारांना घरोघरी जाऊन ही पाकिटे दिली जात आहेत.यासंबधीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याविषयी बोलत असल्याचे दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत असून त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कंडोमचे वाटप करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंडोम वाटपावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

Panchang 8 July 2025: आजच्या दिवशी गणपतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2025

kolhapur News : पावसाचा फटका! 'पन्हाळा तालुक्यातील ३३४० शेतकरी सापडले आर्थिक संकटात'; अद्याप शासनाकडून भरपाई नाही..

SCROLL FOR NEXT