p chidambaram e sakal
देश

TMC अन् AAP च्या आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्वीकारणार : पी. चिदंबरम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला. त्यानंतर पक्षात फेरबदल करण्यासाठी बैठक घेण्यात आली. तसेच काँग्रेसमधील एक गट देखील नाराज असल्यानं पक्षामध्ये गृहकलह निर्माण झाला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नमतं घेणार असल्याचं दिसतंय. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप (AAP) आणि तृणमूलसोबतच्या (TMC) आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी सांगितलं.

प्रत्येक पक्षाला काहीतरी जुळवाजुळव करावी लागेल. हे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही लागू होते. हा लढा राज्या-राज्यात होणार आहे. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वाखाली लढावे लागणार आहे. पंजाबमध्ये 'आप'च्या नेतृत्वाखाली लढायचे आहे. भाजपशी राज्या-राज्यात लढले तर त्यांचा पराभव करणे शक्य आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपला हरविण्यासाठी जुळवाजुळव करायची असल्यास आम्ही करू. आप आणि तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करू आणि त्या आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार असल्याचं पी चिदंबरम म्हणाले. ते एनडीटीव्हीसोबत बोलत होते.

काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक कधी? -

गांधी कुटुंबीयांनी पक्षाचा राजीनामा सोपविण्याची तयारी दर्शवली होती. पण, काँग्रेस वर्कींग कमिटीनं त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. आता काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाची निवड होणे गरजेचे आहे. ते येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत करू. गांधी कुटुंबीयांनी पक्षाची जबाबदारी घेतली आहे. मी गोव्यासाठी जबाबदारी घेतली आहे. पण, फक्त मोजक्या लोकांनी जबाबदारी घेऊन चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक तालुका, जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे, असंही चिदंमबरम म्हणाले.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे सरकार नऊ राज्यांमध्ये होते. पण, त्यापैकी काही राज्य काँग्रेसच्या हातातून गेले आहे. त्यामुळे विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक घेण्यात आली. पण, काही जणांची निराशा झाली. दोन वर्षांपूर्वी सोनिया गांधींना पत्र लिहिलेल्या पक्षातील २३ असंतुष्ट नेत्यांची चांगलीच निराशा झाल्याचे दिसून येतेय. त्यांची देखील वेगळी बैठक झाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये गृहकलह निर्माण झाला असून काँग्रेसचे विभाजन होणार का? अशाही चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT