CR Kesavan esakal
देश

CR Kesavan : काँग्रेसला मोठा धक्का; देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारींच्या पणतूचा राजीनामा!

सीआर केसवन यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता नव्या वाटेवर जाण्याची वेळ आलीये. म्हणूनच, मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचंही केशवन यांनी स्पष्ट केलं.

देशाचे पहिले गव्हर्नर जनरल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी राजगोपालाचारी (Governor General C Rajagopalachari) यांचे पणतू सीआर केसवन (CR Kesavan) यांनी काँग्रेस पक्षाचा (Congress) राजीनामा दिलाय.

सीआर केसवन यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे. राजीनामा पत्रात केसवन यांनी लिहिलंय, गेल्या दोन दशकांपासून मी पक्षासाठी काम करत आहे. परंतु, माझ्याकडं वारंवार दुर्लक्ष केलं गेलं आहे. यामुळंच मी राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली नाही किंवा भारत जोडो यात्रेतही भाग घेतला नाही, असं केशवन यांनी सांगितलं.

आता नव्या वाटेवर जाण्याची वेळ आलीये. म्हणूनच, मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचंही केशवन यांनी स्पष्ट केलं. केशवन यांनी तामिळनाडू काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांकडंही राजीनामा पाठवला आहे. केशवन यांनी सध्या इतर कोणत्याही पक्षात प्रवेश नाकारला आहे. सीआर केसवन यांनी 2001 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान त्यांनी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेचं उपाध्यक्षपदही भूषवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT