jairam ramesh doval main.jpg 
देश

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी अजित डोवाल यांच्या मुलाची मागितली माफी

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र विवेक डोवाल यांची बदनामी प्रकरणी माफी मागितली आहे. विवेक डोवाल यांनी जयराम रमेश आणि कारवां मॅगझिनविरोधात बदनामीकारक वक्तव्य आणि लेखासाठी मानहानीचा खटला दाखल केला होता. 

जयराम रमेश यांनी म्हटले की, मी विवेक डोवाल यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. निवडणुकीच्या काळात रागाच्या भरात मी अनेक आरोप केले होते. मी त्याची खात्री करायला हवी होती. यावर विवेक डोवाल यांनी म्हटले की, जयराम रमेश यांनी माफी मागितली आहे आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला आहे. कारवां मॅगझीनविरोधातील बदनामीचा खटला सुरुच राहील. 

विवेक डोवाल यांनी सोमवारी मानहानी करणारा लेख प्रकाशित केल्याप्रकरणी कारवां मॅगझीनवर फौजदारी खटला दाखल केला होता. विवेक यांनी याप्रकरणी जयराम रमेश यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानंतर कारंवा पत्रिकेतील या लेखाचे लेखक जयराम रमेश यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. विवेक एक विदेशी फंड कंपनी चालवत आहेत. त्या कंपनीचे प्रमोटर्स हे संशयित पार्श्वभूमीचे आहेत. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समर विशाल हे मंगळवारी यावर सुनावणी करु शकतात. 

'द कारवां' नावाच्या एका वेब मॅगझीनने अजित डोवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. अजित डोवाल यांचे पुत्र विवेक डोवाल किमॅन आयलँडमध्ये हेज फंड चालवतात. हा हेज फंड 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या 13 दिवसांनंतर नोंदवण्यात आला होता. विवेक यांचा हा व्यवसाय त्यांचे बंधू शौर्य डोभाल यांच्या व्यवसायाशी निगडीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

IPL 2026: सूर्याला धुरंधरची 'क्रेझ' Video Viral

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT