padma award esakal
देश

गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार घोषणेमुळे काँग्रेसमध्ये वाद!

सकाळ डिजिटल टीम

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच अशा पद्म पुरस्काराची (Padma Awards 2022) घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद (ghulam nabi azad padma awards) यांचा पद्मभूषण पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे. गुलाब नबी आझाद यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीका केल्याचे दिसून आले. यामुळे आता कॉंग्रेसमध्येच वाद उफाळून येत असल्याचे दिसत आहे.

पद्म पुरस्काराने काँग्रेसमध्ये वाद

गुलाम नबी आझाद पद्म पुरस्काराने काँग्रेस मध्ये वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी नाव न घेता गुलाम नबी आझाद यांच्यावर पद्म पुरस्कार टीका केली. तर कपिल सिब्बल यांनी गुलाब नबी आझाद यांच्या बाजूने ट्विट केले

काँग्रेस नेते रमेश यांनी आझाद यांच्यावर प्रत्यक्षपणे निशाणा साधला.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री तथा कम्यनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला. मात्र, पुरस्कारांची घोषणा होताच बुद्धदेव भट्टाचार्य यांनी भूमिका मांडत पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. भट्टाचार्य यांच्या या निर्णयावरून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मात्र, गुलाम नबी आझाद यांच्यावर प्रत्यक्षपणे निशाणा साधला.

भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट

पद्म पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींबरोबरच काही राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचीही निवड करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री बुद्धीदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं.

भट्टाचार्य यांच्या निर्णयाची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी एक ट्वीट केलं. ज्यात भट्टाचार्य यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याबरोबरच त्यांनी अप्रत्यक्षपणे गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला. 'चांगलं काम केलं. त्यांना गुलाम म्हणून नाही, तर आझाद (स्वतंत्र) राहायचं आहे', असं जयराम रमेश म्हणाले. त्यांचं हे ट्वीट चांगलं चर्चेत आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT