Congress leader Satish Jarkiholi esakal
देश

Loksabha Election : मंत्रीपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचा 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? जारकीहोळी म्हणाले, हायकमांडनं मला..

दुसऱ्यांदा लवकरात लवकर बेळगावात बैठक घेऊन चर्चा करू - पालकमंत्री जारकीहोळी

सकाळ डिजिटल टीम

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून दाखवा, अशा सूचना नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

बेळगाव : लोकसभा निवडणूक (Belgaum Loksabha Election) जशी जवळ येत आहे, तशी नेत्यांची राजकीय वक्तव्येही समोर येत आहेत. आता काँग्रेस (Congress) नेते सतीश जारकीहोळी यांनीही लोकसभेबाबत महत्वाचं विधान केलंय.

हायकमांडनं मला लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलेलं नाही. मात्र, अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी सर्वांनी तयारी करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी (Congress leader Satish Jarkiholi) यांनी सांगितलं.

कुमार गंधर्व रंगमंदिर आवारात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून दाखवा, अशा सूचना नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. आपल्या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे.

बंगळुरमध्ये उमेदवार निवडीबाबत आधीच चर्चा झाली आहे. दुसऱ्यांदा लवकरात लवकर बेळगावात बैठक घेऊन चर्चा करू. हायकमांडनं मला लोकसभा निवडणूक लढवण्याची सूचना केलेली नाही. इच्छुक उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. विद्यमान आणि माजी मंत्र्यांनी निवडणूक लढवावी, असं कुठंही म्हटलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

विजयाची शक्यता असलेल्या उमेदवाराला संधी देऊ. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर काँग्रेस लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मात्र, या निवडणुकीत अधिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT