Congress Meeting 
देश

Congress Meeting: दिल्लीतील बैठकीत काय घडलं? लोकसभेसाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी दिला सल्ला

Sandip Kapde

Congress Meeting: राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल तसेच राहुल गांधी देखील या बैठकीत हजर होते. या बैठकीत राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाली. राज्यातील २५ नेते बैठकीला उपस्थित होते.

नाना पटोले, बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, वर्षा गायकवाड, अमित देशमुख हे नेते यावेळी उपस्थित होते.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, लोकसभेच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचं, यावर बैठकीत चर्चा झाली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्र काँग्रेसचा आढावा घेण्यात आला.

भाई जगताप म्हणाले, देशाचे भवितव्य वाचवायचे असेल, तर २०२४ च्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्व नेत्यांनी कंबर कसली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नवीन परिस्थीती निर्माण झाली आहे. काँग्रेसला आता नवीन जागा निर्माण करणार आहे. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे वरिष्ठांनी सांगितले. काँग्रेस चांगल्या जागा लढवणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

के सी वेणुगोपाल म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली.4 तास महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत चांगला अनुभव आला. त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना आपण निवडणूक कशा जिंकू शकतो हे सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : मेटाची जागतिक टीम आणखी काही दिवस भारतात राहणार

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT