Jagdish Shettar esakal
देश

Jagadish Shettar : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 'इतक्या' जागा जिंकणार; आमदारानं स्पष्टचं सांगितलं कारण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोफत तांदूळ योजना सुरू केल्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस सरकारची लोकप्रियता वाढेल.

बंगळूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार (Congress MLA) जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांनी शनिवारी भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) कडून कर्नाटकाला तांदूळ खरेदी करण्यास नकार दिल्याबद्दल केंद्रावर टीका केली आणि हा अक्षम्य गुन्हा असल्याचा आरोप केला.

पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले, "दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबातील सदस्यांना दहा किलो तांदूळ देण्याच्या उद्देशाने 'अन्नभाग्य' योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्याला तांदूळ विक्री नाकारणे, तांदूळ विकण्यास नकार देणे, ही चांगली वागणूक नाही.

आधी तांदूळ देण्याचे आश्वासन देऊनही आता ते राजकारण करत आहेत. केंद्र सरकारने राज्याला अतिरिक्त तांदूळ त्वरित द्यावा. " दरम्यान, केंद्र सरकारने राज्याला तांदूळ देण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्याशी चर्चा करु.

बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा, मुख्य सचिव वंदिता शर्मा आणि अन्न विभागाचे उच्चाधिकाऱ्यांची बैठकही घेऊ. मोफत बसप्रवास योजना लागू झाल्यानंतर पक्ष आणि सरकारची प्रतिष्ठा सातत्याने वाढत आहे.

मोफत तांदूळ योजना सुरू केल्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस सरकारची लोकप्रियता वाढेल आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात हा विकास भाजपसाठी प्रतिकूल ठरेल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते.

लोकसभेत काँग्रेसला सात जागा शक्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. लोकसभा निवडणुकीत अधिकाअधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करु. उत्तर कर्नाटकात ११ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ६ ते ७ मतदारसंघात विजय मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT