CM Siddaramaiah esakal
देश

Loksabha Election : काँग्रेस कर्नाटकात लोकसभेच्या 'इतक्या' जागा जिंकणार; मुख्यमंत्र्यांनी आकडाच सांगून टाकला

'काँग्रेस पक्षाने कर्नाटकात १३५ जागा जिंकल्या आहेत'

सकाळ डिजिटल टीम

भाजपकडे लोकांची तक्रार करण्यासारखे काही नाही. त्यामुळे ते खोटे आरोप करत आहेत.

अथणी : भाजपने भ्रष्टाचार, दरवाढ, धार्मिक राजकारण करून राज्याची आर्थिक नासधूस केली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने १३५ जागा जिंकल्या आहेत, हे भाजपच्या भीतीचे कारण आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कर्नाटकात किमान २० जागा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी व्यक्त केला.

अथणी येथे दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कंत्राटदारांच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून ठेकेदाराची बिले अदा केलेली नाहीत. आमचे सरकार कोणत्याही कंत्राटदाराचे बिल देण्यास अडथळा आणणार नाही. भाजपकडे लोकांची तक्रार करण्यासारखे काही नाही. त्यामुळे ते खोटे आरोप करत आहेत.

खासदार शोभा करंदलाजे आणि इतरांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांसमोर आहे. राहुल गांधी यांनी अधिवेशनात अविश्वास ठरावावेळी केंद्र सरकारवर कडाडून टीका केल्यामुळे त्यांनी तक्रार केली होती. मंत्री चेलुवरायस्वामी यांच्यावरील आरोपाबाबत त्यांनी हा आरोप कुठे ऐकला, असा सवाल केला.

आत्महत्या केलेल्या संतोष पाटील या कंत्राटदाराच्या प्रकरणाबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने ते सीआयडीकडे सोपवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आपण विचार करू, कायदा विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

आपल्या सरकारवर लादेनचे सरकार असल्याची टीका माजी मंत्री आर. अशोक यांनी केली हे पाहता त्यांना लोकसभा निवडणूक हरण्याची भीती आहे. त्यामुळे ते हतबल झाले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांनी अपंग व्यक्तीला मारहाण केल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, पोलिसांनी जे केले ते चुकीचे होते. मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी करण्यात आली आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

'आई कायम जिवंत राहावी म्हणून झाडं लावली' सयाजी शिंदे वृक्षलागवडीबद्दल म्हणाले, 'सरकारने जमीन हिरावली पण...'

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा - जयंत पाटील

Vaibhav Sooryavanshi च्या प्रभावाखाली झाकून जाण्यापेक्षा, यशस्वी जैस्वाल याला RR सोडण्याचा सल्ला; Mumbai Indians योग्य पर्याय...

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

SCROLL FOR NEXT