Narendra Modi & Rahul Gandhi Esakal
देश

'PM मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी जाहिरातींवर २३ अब्ज रुपये खर्च', काँग्रेसने दाखवला 'तो' व्हिडिओ

मोदी १८ तास काम करत असतील तर त्यांना जाहिरातीवर इतके पैसे खर्च करण्याची गरज काय? काँग्रेसचा प्रश्न

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेसने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी मोदी सरकारने तब्बल २३०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंबधीचा एक व्हिडिओ काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

तर 'मोदी १८ तास काम करत असतील तर त्यांना जाहिरातीवरती इतके पैसे खर्च करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेसने ट्विट केलेल्या कॅप्शनमध्ये, “२३ अब्ज (२३०० कोटी) रुपये, पुन्हा एकदा वाचा पंतप्रधान मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी वर्तमानपत्रातील जाहिरातींवर २३ अब्ज रुपये खर्च करण्यात आले”, लिहालं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहे. “सत्तेतील राजकीय पक्ष करदात्यांच्या पैशांचा वापर आपल्या पक्षाच्या हितासाठी करतो की, देशाच्या हितासाठी हे जनतेला पाहावं लागेल असं ते म्हणतात.”

'मोदी बोलतात एक आणि वागतात वेगळं. पंतप्रधान मोदींनी स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी करदात्यांचा पैसा पाण्यासारखा खर्च केला आहे. सत्तेत आल्यानंतर केवळ ७ वर्षात मोदी सरकारने लोकांच्या मेहनतीची कमाई मोदींनी स्व:तावर २३०० कोटी रुपये (२३ अब्ज) स्वतःच्या जाहिरातीवर खर्च केले आहे, असं व्हिडीओत काँग्रेसने म्हटलं आहे.

गरिबांचं सरकार म्हणणाऱ्या मोदी सरकारकडून २३०० कोटी रुपये स्वतःचा चेहरा चमकवण्यासाठी खर्च करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मोदी सरकारने दर दिवसाला ९० लाख, दर तासाला ३ लाख ७५ हजार रुपये इतका खर्च मोदींना हिरो दाखवण्यासाठी केला आहे. हा आकडा फक्त वर्तमानपत्रांचा आहे. तर इतर माध्यमांतील खर्च यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे,” असा दावाही काँग्रेसने केला आहे.

तर वर्तमानपत्र सोडुन रेडिओ, सोशल मीडिया, टीव्ही, बॅनर यावर किती पैसे खर्च झाले असतील याचा विचार करा. मोदींनी १८ तास काम केलं असतं, तर मोदींवर जाहिरात देण्याची वेळ आली नसती. मोदींनी २३०० कोटी रुपये त्यांची प्रतिमा निर्माण करण्यावर खर्च केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

तर या जाहिरातींवर खर्च केलेल्या २३०० कोटी रुपयांमध्ये दोन वर्षे १० लाख मुलांचं पोट भरलं असतं असं काँग्रेसने म्हंटलं आहे. तर या पैंशामध्ये ४ नवे एम्स आणि ४ नवे आयआयटी बनले असते. याच पैशात हजारो किलोमीटर रस्ते झाले असते. मात्र, मोदींना मोहापुढे काहीच महत्त्वाचं वाटलं नाही. सरकारची इच्छा असती, तर या पैशांचा वापर सामान्य नागरिकांसाठी केला असता. मात्र, मोदी सरकारने तसं केलं नाही. कारण त्यांच्यासाठी सर्वांची साथ आणि स्वतःचा विकासच महत्त्वाचा आहे,” असा खोचक टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT