Congress President Election Shashi Tharoor esakal
देश

Congress : शशी थरूरांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध; म्हणाले, भाजपला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसनं..

'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.'

सकाळ डिजिटल टीम

'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.'

Congress President Election : काँग्रेस पक्षाला अडीच दशकांनंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.

गुरुवारी केरळमध्ये खासदार शशी थरूर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसनं पक्षाचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, असं सांगितलं. त्यानंतर तामिळनाडूतील काँग्रेसचे राज्य मुख्यालय सत्यमूर्ती भवन इथं पत्रकारांशी बोलताना थरूर म्हणाले, "पक्षाचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे, कार्यकर्त्यांना सशक्त केलं पाहिजे आणि लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. मला विश्वास आहे की, यामुळं काँग्रेसला मदतच होईल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण आदर असल्याचं स्पष्ट करून थरूर म्हणाले, ही निवडणूक भाजपशी लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. तिचा विचारधारेशी काहीही संबंध नाही. कारण, दोघंही सारखेच आहोत. आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना थरूर म्हणाले, "आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला तरुणांना पक्षात सामावून घेऊन त्यांना खरी ताकद देण्याची गरज आहे. त्याच बरोबर कष्टाळू आणि जुन्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देण्याची गरज आहे."

जाहीरनाम्यात ते म्हणाले, सत्तेचं/अधिकारांचं विकेंद्रीकरण, बूथ स्तरावर पक्ष मजबूत करणं, पक्षाचे राज्य प्रभारी म्हणून काम करणाऱ्या सरचिटणीसांचा देश उभारणीशी संबंधित कामांसाठी वापर करणं आणि प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ त्यांच्यापुरता मर्यादित करणं, असं त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप आमदार सपम सिंह यांचे निधन; वयाच्या ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nene Sardar Wada Mavlange Village History : जमिनीखाली लपलेला गुप्त चोरकप्पा अन् गडकिल्ल्यासारखी तटबंदी; रत्नागिरीतील 250 वर्षे जुन्या 'नेने सरदार वाड्या'चे अद्भुत रहस्य

ऐश्वर्याला सलमानपासून वाचवायचं होतं... मराठमोळ्या बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला- सात दिवसात नोकरी सोडली कारण...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधील वैशाली जिल्ह्यात नितीश सेतूचे उद्घाटन; राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची उपस्थिती

Gold Silver Rate Jalgaon: सुवर्णनगरी जळगावमध्ये सोनं-चांदीचे भाव कोसळले! राज्यातील सर्वात स्वस्त दरात सोनं; १ तोळा कितीला?

SCROLL FOR NEXT